Thursday, February 27, 2025

  वृत्त क्रमांक 232

माहूरच्या भाविकांना अधिक उत्तम व तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी 

 माहूर गडावरील प्रस्तावित प्रकल्पांची राहुल कर्डिले यांच्याकडून पाहणी 

नांदेड ( माहूर ) दि.२६ फेब्रुवारी : महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणारे माहूर आध्यात्मिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणच्या सोयी सुविधा व प्रस्तावित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्याकडे लक्ष दया, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज माहूर येथे दिल्या.

 माहूर गडावर आज त्यांनी भेट दिली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली  तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे  उपकार्यकारी अभियंता भोकर प्रशांत कोरे,तहसीलदार किशोर यादव,मंदिर विश्वस्त उपस्थित होते. या ठिकाणी उभारल्या जात असलेला लिफ्ट व स्कायवॉकच्या कामाची पाहणी, गडावरील दुकानदारांच्या समस्या,रस्त्यांचे विस्तारीकरण, सुशोभीकरण तसेच माहुरच्या विविध ठिकाणी भेटी देताना श्रद्धाळू व पर्यटकांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी, विश्वस्तांची चर्चा केली.

प्राचीन ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या माहूरगडासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळाला जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या परिसरातील अतिक्रमण, फेरीवाल्यांच्या समस्या आणि सर्व प्रलंबित प्रकल्प काल मर्यादेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी त्यांनी माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरांच्या विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले.

000000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 235 उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा कार्यक्रम                                                                    ...