Tuesday, April 20, 2021

1 हजार 15 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 157 व्यक्ती कोरोना बाधित 25 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

                        1 हजार 15 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी 

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 157 व्यक्ती कोरोना बाधित

 25 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 287 अहवालापैकी  1 हजार 157 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 917 तर अँटिजेन तपासणीद्वारे 240 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 70 हजार 419 एवढी झाली असून यातील 54  हजार  761 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14  हजार  100 रुग्ण उपचार घेत असून 210 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 18 ते 20 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 297 एवढी झाली आहे.   दिनांक 18 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हदगाव येथील 60 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील खानापूर येथील अनुक्रमे 60 व 65 वर्षाचे दोन पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय येथे मुखेड येथील 55 वर्षाची महिला, मुखेड तालुक्यातील सलगरा येथील 50 वर्षाचा पुरुष, नारायणा कोविड रुगणालय येथे कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 65 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय येथे अर्धापूर तालुक्यातील शेणी येथील 65 वर्षाचा पुरुष, संजिवनी कोविड रुग्णालय येथे नरसी येथील 30 वर्षाचा पुरुष, दिनांक 19 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे नायगाव येथील 78 वर्षाची महिला, डौर तालुका अर्धापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, अर्धापूर येथील 71 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अर्धापूर येथील 65 वर्षाची महिला,विष्णुपुरी नांदेड येथील 56 वर्षाची महिला, पवन नगर नांदेड येथे 55 वर्षाची महिला, लहान तालुका अर्धापूर येथील 47 वर्षाचा पुरुष, देगलूर येथील 60 वर्षाचा पुरुष, बारड तालुका मुदखेड येथील 50 वर्षाची महिला,किनवट कोविड रुग्णालय येथे अंबाडी तालुका किनवट येथील 38 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे आलू वडगाव तालुका मुखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, जांब तालुका मुखेड येथील 56 वर्षाचा पुरुष, अपेक्षा कोविड रुग्णालय तरोडा नांदेड येथे 33 वर्षाचा पुरुष, लोटस कोविड रुग्णालय येथे भावसार चौक नांदेड येथील 79 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे राजूरा तालुका मुखेड येथील 55 वर्षाचा पुरुष दिनांक 20 एप्रिल रोजी मुखेड कोविड रुग्णालय येथे जांब तालुका मुखेड येथील 56 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.76 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 458 , नांदेड ग्रामीण 16, अर्धापूर 74,  भोकर 2,  बिलोली 4, देगलूर 60, धर्माबाद 28, हिमायतनगर 5, कंधार 73, किनवट 18, लोहा 33मुखेड 5, मुदखेड 30, नायगाव 28, उमरी 25, हदगाव 55, हिंगोली 2, यवतमाळ 1, असे एकूण 917 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 70, नांदेड ग्रामीण 3, अर्धापूर 7, भोकर 3, बिलोली 2, देगलूर 6, धर्माबाद 2, हदगाव 18, हिमायतनगर 7, कंधार 10, किनवट 12, लोहा 4, माहूर 8, मुदखेड 28, मुखेड 5, नायगाव 34, उमरी 7, परभणी 2, लातूर 1, यवतमाळ 1, हिंगोली 9, पुणे 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 240 बाधित आढळले.

 

आज 1 हजार 15 कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 389, बिलोली तालुक्याअंतर्गत 101,  नायगाव तालुक्यातंर्गत 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 19, मुखेड कोविड रुगणालय 92, कंधार तालुक्याअंतर्गत 20, माहूर तालुक्यातंर्गत 12, अर्धापूर तालुक्यातंर्गत 45, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, हदगाव कोविड रुग्णालय 60, भोकर तालुक्यातंर्गत 99, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 32, लोहा तालुक्यातर्गंत 36, खाजगी रुग्णालय 75 यांचा समावेश आहे. 

 

जिल्ह्यात 14 हजार 100 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 243, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 118, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 224, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 146, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 163, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 214, देगलूर कोविड रुग्णालय 49, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 61, बिलोली कोविड केअर सेंटर 268, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14, नायगाव कोविड केअर सेंटर 40, उमरी कोविड केअर सेंटर 66, माहूर कोविड केअर सेंटर 40, भोकर कोविड केअर सेंटर 18, हदगाव कोविड रुग्णालय 41, हदगाव कोविड केअर सेंटर 32, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 121, कंधार कोविड केअर सेंटर 34, धर्माबाद कोविड केअर सेंटर 135, मुदखेड कोविड केअर सेंटर 312, अर्धापूर कोविड केअर सेटर 33, बारड कोविड केअर सेंटर 21, भक्ती कोविड केअर सेटर 15, एनआरआय कोविड केअर सेंटर 90, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 180, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 840, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 3 हजार 763, खाजगी रुग्णालय 1 हजार 818, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 14 हजार 100 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 4, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 8 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 27 हजार 860

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 43 हजार 872

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 70 हजार 419

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 54 हजार 761

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 297

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-27

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-85

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-404

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14 हजार 100

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-210

00000

20 एप्रिलपासून किराणा, भाजीपाला-फळविक्रेते सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु

                                                   20 एप्रिलपासून किराणा, भाजीपाला-फळविक्रेते

        सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भावा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दिनांक 14 एप्रिल2021 रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. या आदेशात पूर्वी दिलेला सकाळी 8  ते 1 या वेळेत बदल करण्यात आला असून हा कालावधी आता कमी केला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकानेभाजीपाला दुकानेफळविक्रेतेडेअरी, बेकरीकन्फेक्शनरी, सर्व खाद्य पदार्थाचे प्रकार  (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी इ.) कृषी विषयक संबंधित दुकाने, कृषी अवजारे आणि शेतातील उत्पादन, पाळीव प्राण्यांच्य अन्न पदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामाशी निगडीत व्यक्तींसाठी तसेच संस्थासाठी देखील साहित्य मिळणारी दुकाने या आस्थापना सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहतील. या दुकानातून घरपोच सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत चालू राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक आदेशात सांगितले आहे. सदर आदेशाची अंमलबजावनी 20 एप्रिल 2021 चे रात्री 8 वाजेपासून ते दिनांक 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यत लागू राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील.

0000

कोविड-19 च्या अनुषंगाने श्रीरामनवमी निमित्त मार्गदर्शक सूचना

                   कोविड-19 च्या अनुषंगाने श्रीरामनवमी निमित्त मार्गदर्शक सूचना

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :-  शासनाने कोव्हिड-19 च्‍या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्‍सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्‍यात येत आहेत. सध्‍या कोविड-19 च्‍या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्‍या अतिसंसर्गजन्‍य परिस्थितीचा विचार करता कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. सध्‍या राज्‍यात तसेच मोठया शहरांमध्‍ये रूग्‍णांच्‍या संख्‍येत पुन्‍हा वाढ होताना दिसत आहे. त्‍यामुळे उद्भवलेल्‍या परिस्थितीचा विचार करता यावर्षी बुधवार 21 एप्रिल 2021 रोजी श्रीरामनवमी हा उत्‍सव अत्‍यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढीलप्रमाणे पाच मागर्दशक सूचनेनुसार कार्यवाही करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

1.    कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आप आपल्‍या घरी श्रीरामनवमी उत्‍सव  साजरा करावा. 

2.   कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्‍थळे बंद ठेवण्‍यात आली असल्‍याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. यावर्षी मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्‍यादींचे किंवा कोणत्‍याही प्रकारे धार्मिक, सांस्‍कृतिक अ‍थवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्‍यात येऊ नये.   

3.      मंदिरामधील व्‍यवस्‍थापक, विश्‍वस्‍त यांनी शक्‍य असल्‍यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेब साईट व फेसबुक इत्‍यादी द्वारे उपलब्‍ध करून द्यावी.                

4.    श्रीरामनवमीच्‍या उत्‍सवानिमित्‍त कोणत्‍याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत.   

5.कोवीड-1च्‍या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या मदत व पुनर्वसन, आरोग्‍य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्‍थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्‍या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्‍यक्ष सण  सुरू होण्‍याच्‍या मधल्‍या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्‍द झाल्‍यास त्‍यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न   करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी , कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही. 

0000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...