Tuesday, March 3, 2020

सुधारीत वृत्त


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे गुरुवारी आयोजन
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे मार्गदर्शन
नांदेड दि. 3 :- उज्ज्वल नांदेड या मोहिमेअतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवार 5 मार्च 2020 रोजी डॉ. करराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम परिसर नांदेड येथे एक दिवसीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर गुरुवार 5 मार्च 2020 रोजी सकाळी 10.30 ते सायं 5 या वेळेत नांदेड नुतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे विद्यार्थ्यांना मार्गदशन करणार आहेत. चालू घडामोडी या विषयावर पुणे येथील प्रा. स्वप्नील सानप मार्गदर्शन करणार आहेत.
या मार्गदर्शनशिबिरास स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
00000


प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
कंधार, हिमायतनगर येथील शिबिरात बदल
नांदेड, दि. 3 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने मार्च 2020 मध्ये कंधार व हिमायतनगर येथील शिबीराच्या दिनांकामध्ये पुढीलप्रमाणे अंशत: बदल करण्यात आला आहे. 
कंधार येथे शनिवार 7 मार्च 2020 रोजीचे शिबीर शनिवार शासकीय सुट्टी असल्याने शुक्रवार 6 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार आहे. हिमायतनगर येथील गुरुवार 12 मार्च 2020 रोजीचे शिबीर कंधार उरुस स्थनिक सुट्टी असल्याने शुक्रवार 13 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार आहे.  
ज्या अनुज्ञप्ती धारकांनी शिबीर कार्यालयात अनुज्ञप्ती मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000


जागतिक महिला दिन   
साजरा करण्याबाबत सुचना
नांदेड, दि. 3 :-  महिला व बालविकास विभागाने रविवार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन साजरा करण्याबाबत शासन परित्रकाद्वारे सुचना निर्गमीत केल्या आहेत.    
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहलिसदार, जिल्हा व सत्र न्यायालय प्रबंधक, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि. प., बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक जि. प., उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी सुचना निर्गमीत केली आहे.   
शासन परिपत्रकातील दिलेल्या सुचनेप्रमाणे रविवार 8 मार्च 2020 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासन व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद केले आहे.
0000


निम्न मानार प्रकल्पांतर्गत
उन्हाळी हंगामात तीन पाणी पाळ्या
नांदेड, दि. 3 :- निम्न मानार प्रकल्पांतर्गत डावा कालवा व उजव्या कालवाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांना व निम्न मानार धरण जलाशय, अधिसुचित नदी, नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व मंजूर उपसा सिंचन योजनाधारकांनी निम्न मानार धरणामधील रब्बी हंगाम अखेर उपलब्ध पाणी साठया नुसार उन्हाळी हंगामात पाणी पाळी क्रमांक एक रविवार 15 मार्च 2020 पासुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पाच्या रब्बी हंगामात काटकसरीने पाणी वापर केल्यामुळे पाण्याची बचत झाल्यामुळे उन्हाळी हंगामात तीन पाणी पाळया देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उन्हाळी हंगाम 2019-2020 साठी निम्न मानार उजवा व डावा कालव्यातील तीन पाणी पाळ्या चालू होण्याचा संभाव्य दिनांक पुढील प्रमाणे राहील. पाणी पाळी क्र. एक रविवार 15 मार्च 2020, पाणीपाळी क्र. दोन बुधवार 15 एप्रिल 2020, पाणीपाळी क्र. तीन शुक्रवार 15 मे 2020 रोजी. निम्न मानार प्रकल्पांतर्गत डावा कालवा, उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीमध्ये सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाऊस, कालवाफुटी व इतर अपरीहार्य कारणांमुळे वेळापत्रकात बदल होईल.
लाभधारकांनी या आवर्तनासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक राहील जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील. उन्हाळी हंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात मुदतीत संबंधित शाखा कार्यालयात दाखल करावीत. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. वैयक्तीक उपसा करणाऱ्या लाभधारकानी पाणी मोजमाप यंत्र बसवून पाणी उपसा करणे बंधनकारक आहे. काही अपरिहार्य किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड हे जबाबदार राहणार नाही.
लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जावून ठाराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. पाणी पाळी सुरू असतांना जबर दस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणी, वसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही. नियमांचे पालन करून नांदेड पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) नांदेड यांनी केले आहे.
00000


हरभरा पिकावरील शेतीशाळेचा शेती दिन संपन्न
नांदेड, दि. 3 :- नुकतेच क्रॉपसॅप संलग्न हरभरा पिकावरील शेतीशाळेचा शेती दिन मुदखेड तालुक्यातील निवघा येथील माधव पवार यांच्या शेतात आयोजीत करण्यात आला होता. या शेतीशाळा शेतीदिनाच्या अध्यक्षस्थानी अशोक पवार हे होते.
यावेळी मुदखेडचे तालुका कृषी अधीकारी आर. एन. शर्मा, कृषी महाबिजचे सहाय्यक क्षेत्रीय अधीकारी श्री. सोनटक्के, कृषी सहाय्यक ए. एन. कंचटवार व मुख्य प्रवर्तक  जी. पी. वाघोळे, बारडचे कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थीत होते.
            या शेतीदिनामध्ये हरभरा पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयावर महाबीजचे सहाय्यक क्षेत्रीय अधीकारी श्री. सोनटक्के मार्गदर्शन म्हणाले, हरभरा पिक सरळवाणचे असल्यामुळे पुढील वर्षाकरीता बियाणे म्हणुन वापर करताना साठवणुक महत्वाची असते. बियाणे साठवणुक ही बारदाण्यामध्ये करावी. तसेच बोरीक पावडरचा वापर किड लागु नये म्हणुन करावा. तसेच साठवणुक करताना थप्पीची संख्या पाच थराची लावावी. भिंती लावुन ठेवू नये जेणे करुन ओलावा तयार होणार नाही,  बियाणे खराब होणार नाही. बाजारात ‍विक्रीसाठी नेतांना स्पायरलव्दारे स्वच्छ करुन गुणवत्तायुक्त माल न्यावा.
            शेतीशाळेबद्दल मनोगत व्यक्त करताना अशोक पवार म्हणाले शेतीशाळेच्या पहिल्या वर्गापासुन ते शेवटच्या वर्गापर्यंत मिळालेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त होते. यामध्ये बिज प्रक्रिया व ‍5 टक्के निंबोळीअर्क तयार करण्याची पध्दतीबद्दल थोडक्यात माहिती दिली. प्रभाकर पवार यांनी मनोगत व्यक्त करताना किटकनाशकाचे शरीरावर होणारे दुष्परीणाम व त्यापासुन घ्यावयाची काळजी याबद्दल प्रात्यक्षीकासह माहिती दिली. मनोरंजनातुन ज्ञानार्जन याबाबत सांघीक खेळ ( फुगे फोडणे,डॅन्सींग डॉल इत्यादी) महत्वाचे ठरतात असेही म्हणाले.
            या शेतीशाळेच्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात खरीप हंगामासाठी घेण्याचे आहवान तालुका कृषी अधीकारी आर. एन. शर्मा यांनी केले.या शेती दिनाचे सुत्रसंचलन मुख्य प्रर्वतक जी. पी. वाघोळे यांनी केले. आभार राजाराम नरडेले यांनी मानले.
00000


‘‘न्याय आपल्या दारी’’ संकल्पनेतून
 जिल्ह्यात फिरते लोकन्यायालय,
  कायदेविषयक शिबीराचे आयोजन
नांदेड दि. 3 :- समाजातील अगदी तळागाळातील लोकांना न्याय मिळावा हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या ‘‘न्याय आपल्या दारी’’ या संकल्पनेतून सुरू केलेल्या फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक शिबीराचे आयोजन जिल्हयात 2 ते 23 मार्च 2020 या कालावधीत करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांच्या हस्ते    रविवार 2 मार्च 2020 रोजी फिरते लोक न्यायालय व कायदेविषयक शिबीर वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सौ. कमल वडगावकर, न्यायाधीश  आर. एस. रोटे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड व जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी उपस्थित होते. तसेच अभिवक्ता संघाचे अध्यक्ष मिलींद लाठकर, आशिष गोधमगावकर, जिल्हा सरकारी वकिल, फिरते लोक न्यायालय मोबाईल व्हॅनचे वाहन चालक के. एल. देशमुख, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी, तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
            या कालावधीत हे वाहन नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यात नियोजीत गावात फिरून न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी प्रकरणे सदर लोक न्यायालयात तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदेविषयक शिबीराद्वारे जनजागृती केली जाणार आहे. 
            या मोबाईल व्हॅनला प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया  व उपस्थित मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून लोहा तालुक्याकडे रवाना करताना त्यांनी फिरते लोक न्यायालयाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व फिरते लोक न्यायालयात जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी व्यक्त केला. 
00000


मंडप / पेंडॉल तपासणी पथके गठीत
संपर्क साधण्याचे आवाहन
        नांदेड दि. 3 :- मा. उच्‍च न्‍यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र.173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या तपासणीच्‍या अनुषंगाने दिलेल्‍या आदेशानूसार नांदेड जिल्‍हयातंर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड हद्दीतील मंडप, पेंडॉल तपासणी करण्‍याबाबत पुढील प्रमाणे पथके गठित करण्‍यात आली आहेत. या तपासणी पथकाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
.क्र
तपासणी पथक सदस्‍याचे नाव
पदनाम
कार्यालयीन दुरध्‍वनी क्र.
मोबाईल क्रमांक
पथक क्र.01  क्षेत्रिय कार्यालय क्र.01 (तरोडा सांगवी)  कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र .01  अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
रितेश रामदास बैरागी
सहाय्यक आयुक्‍त
8087489715
2
एस.एन.ननावरे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
02462-221100
8805186113
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462- 261364
9923131121
4
नितीन तोरणेकर
प्र.कार्यालय अधिक्षक
8888801952
5
बळीराम बी .एंगडे
वसुली पर्यवेक्षक
8605586531
6
साहेबराव ढगे
लिपीक
8888801975
7
 म.मकसुद अहेमद           
लिपीक
8766869099
8
आनंदा गायकवाड
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
9881533444
9
 विश्‍वनाथ बी.कल्‍याणकर
स्‍वच्‍छता निरीक्षक
9011000969
पथक क्र.02 क्षेत्रिय कार्यालय क्र.02 अशोक नगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.02 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
मीर्झा फरहतउल्‍ला बेग
प्र.क्षेत्रीय अधिकारी
9011000950
2
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462-261364
9923131121
3
एस.एन.ननावरे
पो.नि.पो.स्‍टे.विमानतळ नांदेड
02462-221100
8805186113
4
मल्‍हार मोरे
कार्यालय अधिक्षक
9822982699
  5
संजय नागापुरकर
प्र.वसुली पर्यवेक्षक
8888801940
6
रतन एम.रोडे     
प्र.स्‍व.निरीक्षक
8888801917
7
अ .नईम अ.गफुर           
प्र.स्‍व.निरीक्षक
9822202081
8
रणजित नारायण पाटील.
प्र.वसुली पर्यवेक्षक
9011001005
9
वसंत कल्‍याणकर
प्र.वसुली पर्यवेक्षक
8888801943
10
विजय वाघमारे
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक
8669037443
11
उत्‍तम नारनाळे
लिपीक
9822261979
पथक क्र.03 क्षेत्रिय कार्यालय क्र.03
शिवाजी नगर कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.03 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
राजेश चव्‍हाण
प्र.क्षेत्रीय अधिकारी

9595333181
2
ए.एन.नरुते
पो.नि.पो.स्‍टे.शिवाजी नगर नांदेड
02462 -256520
9823802677
3
अनिरुध्‍द काकडे
पो.नि.पो.स्‍टे.भाग्‍यनगर नांदेड
02462- 261364
9923131121
4
किशोर  नागठाणे
प्र.कार्यालय अधिक्षक
9890729587
5
वामन भानेगावकर
प्र. वसुली पर्यवेक्षक

7620568868
6
परसराम गाढे पाटील
प्र. वसुली पर्यवेक्षक

8888801918
7
सुरेश पाशमवाड
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000974
8
राजेश क-हाळे   
लिपीक

8087141064
9
जीलानी पाशा
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000971
पथक क्र.04 क्षेत्रिय कार्यालय क्र.04 वजिराबाद कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.04 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
प्रकाश गच्‍चे
प्र.क्षेत्रीय अधिकारी

8888801960
2
एस.एस.शिवाळे
पो.नि.पो.स्‍टे.वजिराबाद
02462 -236500
7020250385
3
एस.डी.नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड
02462-236510
9561045306
4
घनश्‍याम परडे
प्र.कार्यालय अधिक्षक

9960037740
5
रमेश वाघमारे
प्र.वसुली पर्यवेक्षक

8888801985

6
अजहर अली जुल्‍फेकार अली
वसुली पर्यवेक्षक

8888801988
7
गोविंद खंडुजी शेटे           
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000972
8
मोहन लांडगे     
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक

9370373846
पथक क्र.05 क्षेत्रिय कार्यालय क्र.05
इतवारा कार्यक्षेत्र नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.05 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
डॉ.श्री मो.रईसोद्दीन           
प्र.क्षेत्रीय अधिकारी

8888892063
2
एस.डी.नरवाडे
पो.नि.पो.स्‍टे.इतवारा नांदेड
02462-236510
9561045306
3
पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा)
02462-226373
9011320100
   4
गोपाळ तोटावाड
प्र.कार्यालय अधिक्षक
9921986989
5
अब्‍दुल हबीब अ.रशीद
वसुली पर्यवेक्षक

8888801998
6
गणेश कोंडावार
लिपीक

8087315765
7
सय्यद जाफर
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक

8380046631
8
दयानंद कवले
स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000975
9
एम.ए.समी एम.ए.सत्‍तार
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक

9011000978

पथक क्र.06 क्षेत्रिय कार्यालय क्र.06 सिडको कार्यक्षेत्र
नांवाशमनपा क्षेत्रीय कार्यालय क्र.06 अंतर्गत संपूर्ण क्षेत्र
1
रावण सोनसळे
प्र.क्षेत्रीय अधिकारी

8888801961
2
पंडीत कच्‍छवे
पो.नि.पो.स्‍टे.नांदेड (ग्रा)
02462-26373
9822458411
3
विलास गजभारे
प्र.कार्यालय अधिक्षक

9890327546
4
राजेश आरटवार
प्र.वसुली पर्यवेक्षक

8888802017
5
किशन वाघमारे
प्र.स्‍वच्‍छता निरीक्षक

8888801992
6
प्रभु गिराम
लिपीक

9921038641
      नागरीकांनी सार्वजनिक सण, उत्‍सव, समारंभ याप्रसंगी उभारण्‍यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्‍या संदर्भात कोणतीही तक्रार असल्‍यास वरील विवरणपत्रा नमूद तपासणी पथक सदस्‍याशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड जिल्हादंडाधिकारी कार्यालय यांनी केले आहे.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...