Tuesday, March 3, 2020


प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
कंधार, हिमायतनगर येथील शिबिरात बदल
नांदेड, दि. 3 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने मार्च 2020 मध्ये कंधार व हिमायतनगर येथील शिबीराच्या दिनांकामध्ये पुढीलप्रमाणे अंशत: बदल करण्यात आला आहे. 
कंधार येथे शनिवार 7 मार्च 2020 रोजीचे शिबीर शनिवार शासकीय सुट्टी असल्याने शुक्रवार 6 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार आहे. हिमायतनगर येथील गुरुवार 12 मार्च 2020 रोजीचे शिबीर कंधार उरुस स्थनिक सुट्टी असल्याने शुक्रवार 13 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार आहे.  
ज्या अनुज्ञप्ती धारकांनी शिबीर कार्यालयात अनुज्ञप्ती मिळण्यासाठी अर्ज सादर केला आहे त्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...