Tuesday, March 3, 2020


हरभरा पिकावरील शेतीशाळेचा शेती दिन संपन्न
नांदेड, दि. 3 :- नुकतेच क्रॉपसॅप संलग्न हरभरा पिकावरील शेतीशाळेचा शेती दिन मुदखेड तालुक्यातील निवघा येथील माधव पवार यांच्या शेतात आयोजीत करण्यात आला होता. या शेतीशाळा शेतीदिनाच्या अध्यक्षस्थानी अशोक पवार हे होते.
यावेळी मुदखेडचे तालुका कृषी अधीकारी आर. एन. शर्मा, कृषी महाबिजचे सहाय्यक क्षेत्रीय अधीकारी श्री. सोनटक्के, कृषी सहाय्यक ए. एन. कंचटवार व मुख्य प्रवर्तक  जी. पी. वाघोळे, बारडचे कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थीत होते.
            या शेतीदिनामध्ये हरभरा पिकाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयावर महाबीजचे सहाय्यक क्षेत्रीय अधीकारी श्री. सोनटक्के मार्गदर्शन म्हणाले, हरभरा पिक सरळवाणचे असल्यामुळे पुढील वर्षाकरीता बियाणे म्हणुन वापर करताना साठवणुक महत्वाची असते. बियाणे साठवणुक ही बारदाण्यामध्ये करावी. तसेच बोरीक पावडरचा वापर किड लागु नये म्हणुन करावा. तसेच साठवणुक करताना थप्पीची संख्या पाच थराची लावावी. भिंती लावुन ठेवू नये जेणे करुन ओलावा तयार होणार नाही,  बियाणे खराब होणार नाही. बाजारात ‍विक्रीसाठी नेतांना स्पायरलव्दारे स्वच्छ करुन गुणवत्तायुक्त माल न्यावा.
            शेतीशाळेबद्दल मनोगत व्यक्त करताना अशोक पवार म्हणाले शेतीशाळेच्या पहिल्या वर्गापासुन ते शेवटच्या वर्गापर्यंत मिळालेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त होते. यामध्ये बिज प्रक्रिया व ‍5 टक्के निंबोळीअर्क तयार करण्याची पध्दतीबद्दल थोडक्यात माहिती दिली. प्रभाकर पवार यांनी मनोगत व्यक्त करताना किटकनाशकाचे शरीरावर होणारे दुष्परीणाम व त्यापासुन घ्यावयाची काळजी याबद्दल प्रात्यक्षीकासह माहिती दिली. मनोरंजनातुन ज्ञानार्जन याबाबत सांघीक खेळ ( फुगे फोडणे,डॅन्सींग डॉल इत्यादी) महत्वाचे ठरतात असेही म्हणाले.
            या शेतीशाळेच्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात खरीप हंगामासाठी घेण्याचे आहवान तालुका कृषी अधीकारी आर. एन. शर्मा यांनी केले.या शेती दिनाचे सुत्रसंचलन मुख्य प्रर्वतक जी. पी. वाघोळे यांनी केले. आभार राजाराम नरडेले यांनी मानले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...