Monday, October 7, 2019
विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक 2019
निवडणूक निरिक्षक (जनरल) दाखल
तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
नांदेड,दि. 7 :- विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक- 2019 च्या निवडणूकीचा कार्यक्रम मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 21 सप्टेंबर
2019 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये घोषित केला आहे. नांदेड जिल्हयातील 09
विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा. निवडणूक निरिक्षक (जनरल) हे
नांदेड जिल्हयात दाखल झाले असून त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
अ.क्र
|
मा.निवडणूक निरिक्षक(जनरल) यांचे नांव
|
विधानसभा मतदारसंघ्
|
भ्रमणध्वनी क्रमांक
|
स्थानिक पत्ता
|
1
|
मा.श्री.अभय राज
|
83 – किनवट,
84 - हदगाव
|
8605651850
|
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.2, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
2
|
मा.श्री.भूवनेश कुमार
|
85 – भोकर,
86 – नांदेड उत्त्र
|
7820849941
|
मिनी सह्याद्री,
सी. एम. सुट, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
3
|
मा.श्री.मोहिंदर पाल
|
87– नांदेड दक्षिण,
88 – लोहा
|
7820860019
|
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.3, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
4
|
मा.श्री. महेश चंद्र चौधरी
|
89–नायगाव,
90–देगलूर,
91–मुखेड
|
9011400989
|
मिनी सह्याद्री, व्ही.आय. पी.1, शासकिय विश्रामगृह, नांदेड
|
तरी
नांदेड जिल्हयातील नागरीकांना कळविण्यात येते की, आपली काही गा-हाणी, तक्रार
किंवा हरकत असल्यास त्यांनी संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मा. निवडणूक निरिक्षक
(जनरल) यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत
आहे.
000000
शाळा, महाविद्यालयाकडून
प्रोफाईल भरण्याचा कालावधीस
मुदतवाढ
नांदेड
दि. 7 :- माध्यमिक शाळा व कनिष्ठ
महाविद्यालयाकडून प्रोफाईल भरुन घेण्याचा कालावधीत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019
हा देण्यात आला होता. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अद्याप प्रोफाईल भरण्याची
कार्यवाही केली नाही अथवा प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याकरीता मुदतवाढीचा कालावधी 1 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर 2019 पर्यंत
राहील. यानंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे
विभागीय सचिव यांनी केले आहे.
0000
पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार याद्या
नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
नांदेड
दि. 7 :- दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
नांदेड
तालुक्यातील 86 नांदेड उत्तर
व 87 नांदेड दक्षिण
मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादी नव्याने तयार करणेसाठी मा. भारत निवडणूक आयोग यांनी खालील प्रमाणे कार्यक्रम जाहीर
केला आहे.
पुनरिक्षणाचे टप्पे
|
कालावधी
|
नमूना
18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्वीकारण्यांचा अंतिम
|
दिनांक
06 नोव्हेबर 2019 (बुधवार)
|
हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार यादंयाची छपाई
|
दिनांक 19 नोव्हेंबर 2019 (मंगळवार)
|
प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्दी
|
दिनांक 23 नोव्हेंबर 2019 (शनिवार) ते 09 डिसेंबर 2019
(सोमवार)
|
दावे व हरकती निकाली काढण्यांचा दिनांक व पुरवणी
|
दिनांक 26 डिसेंबर 2019 (गुरुवार)
|
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी
|
दिनांक 30 डिसेंबर 2019 (सोमवार)
|
मा. भारत निवडणूक आयोगाने च्या
सुचनेनुसार नांदेड
तालुक्यातील पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदार
नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये पदवीधर व शिक्षक संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेसाठी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यांत येत आहे. या प्रसिध्दी पत्रकात नमूद दिनांकापर्यंत सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले
फॉर्म तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
00000
दिव्यांग मतदाराच्या
जागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन
नांदेड
दि. 7 :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2019 अंतर्गत 87- दक्षिण
नांदेड विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासंदर्भात
निवडणुक आयोगाने दिव्यांग मतदार जनजागृती अभियान हाती घेतले आहे.
देशातील
प्रत्येकाला मतदानाचा सारखाच अधिकार आहे हा विचार रुजविण्यासाठी, आपण
इतरांपेक्षा वेगळे नाही ही भावना प्रत्येक दिव्यांग मतदारांमध्ये वाढली पाहीजे
या दृष्टीने निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणुन 'माझं मत
माझा स्वाभिमान' या पथनाट्याचे सादरीकरण 9 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड व जिल्हा प्राथमीक शाळा डेरला येथे
दुपारी 12 या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
या
पथनाट्यातुन दिव्यांग मतदारांना मतदाना दिवशी पुरविण्यात येणा-या सुविधा जसे
मतदान केंद्रापर्यत स्वतंत्र वाहतुक व्यवस्था, व्हील चेअर, रॅम्प, मदतनीस, पीण्याचे
पाणी, ब्रेल लिपीतील व चिन्हांकीत मतपत्रीका तसेच इतर सुविधा याबाबत माहिती
उपस्थितांना देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी
दिव्यांग मतदारांना कशा प्रकारे सहाय्य करावे याबाबत सुद्धा पथनाटयातुन माहिती
देण्यात येणार आहे.
या पथनाट्याचे सादरीकरण नारायणराव चव्हाण विधी
महाविद्यालयाचे विद्यार्थी सुरज मंत्री, मारुती कदम, केदार जोशी, चैतन्य अर्जुने,
ऋषीकेश यादव व कृष्णाकांत अमंगे हे करणार आहेत. या पथनाट्याचे लेखन पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॅा.अशेाक
सिद्धेवाड यांनी तर दिग्दर्शक नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे
प्रा.डॅा.महेश पाटील कारलेकर यांनी केले.
या
पथनाट्याचे सादरीकरणाच्या प्रसंगी अधिकाधीक मतदारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन
निवडणुक निर्णय अधिकारी 87-
दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण,
सहा. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अरुण ज-हाड, नायब तहसीलदार
सौ.उर्मीला कुलकर्णी व पीडब्लुडी कक्षातील प्रा डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा. डॅा..
सुग्रीव फड, प्रा.डॅा.महेश पाटील यांनी केले आहे.
0000
“माझं मत माझा महाराष्ट्र” मतदार जनजागृती
कार्यक्रमाच्या
कलापथक, चित्ररथाचे जिल्हाधिकारी
अरुण डोंगरे यांचे हस्ते उद्घाटन
नांदेड
दि. 7 :- जिल्हा निवडणूक विभाग नांदेड व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो नांदेड
यांचे संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणूकीत मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी
वाढविण्यासाठी “माझं मत माझा महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या
कलापथक व चित्ररथाचे दिनांक 7 ऑक्टोंबर 2019 रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे
हस्ते झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सर्व उपस्थिताना निर्भय व निष्पक्षपणे मतदान
करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,
निळकंठ पाचंगे तसेच क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो कार्यालयाचे सुमित दोडल हे
उपस्थित होते.
या
माझं मत माझा महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाहीर रमेश गिरी यांच्या
शिवशक्ती कलामंच नांदेड यांच्यावतीने आज 86 नांदेड विधानसभा मतदारसंघात विविध सहा
ठिकाणी पोवाडा, पथनाट्य, गीत आदीचे माध्यमातुन मतदार जनजागृती करण्यात आली. या
मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. या
कार्यक्रमांचे टप्याटप्याने इतर मतदारसंघातही आयोजन करण्यात येणार आहे.
“माझं मत माझा महाराष्ट्र” मतदार जनजागृती
कार्यक्रम 86 नांदेड उत्तर मतदारसंघात घेण्यासाठीचे नियोजन केंद्रीय लोकसंपर्क
ब्युरो, नांदेडचे सुमित दोडल व 86 नांदेड उत्तरच्या मतदार जनजागृती कक्ष(स्विप)
प्रमुख रुस्तुम आडे, यांचेसह प्रसाद शिरपूरकर, गणेश रायेवार, श्रीमती कविता जोशी,
श्रीमती अनघा जोशी यांनी केले.
00000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...