Monday, October 7, 2019


माझं मत माझा महाराष्‍ट्र मतदार जनजागृती कार्यक्रमाच्‍या
कलापथक, चित्ररथाचे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्‍ते उद्घाटन
नांदेड दि. 7 :- जिल्‍हा निवडणूक विभाग नांदेड व क्षेत्रिय लोकसंपर्क ब्‍युरो नांदेड यांचे संयुक्‍त विद्यमाने विधानसभा निवडणूकीत मतदान जनजागृती व मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी माझं मत माझा महाराष्‍ट्र या कार्यक्रमाच्‍या कलापथक व चित्ररथाचे दिनांक 7 ऑक्टोंबर 2019 रोजी जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्‍ते झेंडी दाखवून उद्घाटन करण्‍यात आले.
याप्रसंगी जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी सर्व उपस्थिताना निर्भय व निष्‍पक्षपणे मतदान करण्‍याचे आवाहन केले. या कार्यक्रमास अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ, निळकंठ पाचंगे तसेच क्षेत्रिय लोकसंपर्क ब्‍युरो कार्यालयाचे सुमित दोडल हे उपस्थित होते.
या माझं मत माझा महाराष्‍ट्र कार्यक्रमांतर्गत शाहीर रमेश गिरी यांच्‍या शिवशक्‍ती कलामंच नांदेड यांच्यावतीने आज 86 नांदेड विधानसभा मतदारसंघात विविध सहा ठिकाणी पोवाडा, पथनाट्य, गीत आदीचे माध्‍यमातुन मतदार जनजागृती करण्‍यात आली. या मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या संख्‍येने प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांचे टप्‍याटप्‍याने इतर मतदारसंघातही आयोजन करण्‍यात येणार आहे.
माझं मत माझा महाराष्‍ट्र मतदार जनजागृती कार्यक्रम 86 नांदेड उत्‍तर मतदारसंघात घेण्‍यासाठीचे नियोजन केंद्रीय लोकसंपर्क ब्‍युरो, नांदेडचे सुमित दोडल व 86 नांदेड उत्‍तरच्‍या मतदार जनजागृती कक्ष(स्विप) प्रमुख रुस्‍तुम आडे, यांचेसह प्रसाद शिरपूरकर, गणेश रायेवार, श्रीमती कविता जोशी, श्रीमती अनघा जोशी यांनी केले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...