Wednesday, July 10, 2024

 वृत्त क्र. 577 

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, दि. 10 जुलै :- जलसंधारण अधिकारी (स्‍थापत्‍य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्‍त पदाच्‍या फेरपरीक्षेकरिता,  परीक्षा केंद्राच्‍या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. ही परीक्षा नांदेड जिल्‍ह्यात आयन डिजिटल झोन आयडीझेड, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी गेट क्रमांक 18 आणि 22 नांदेड या परीक्षा केंद्रावर घेण्‍यात येणार आहे. 

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदर  परीक्षा केद्रापासून 100 मीटरच्या परिसरात,  दि. 14, 15 व 16 जुलै 2024 रोजी  सकाळी 7 ते  रात्री  9 वाजेपर्यतच्‍या कालावधीत, परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स,झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

वृत्त क्र. 576 

कंधार शहरात 16 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही 

नांदेड, दि. 10 जुलै :- कंधार शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 9 जुलै रोजी कंधार शहरात अचानकधाडी टाकून एकूण 16 तंबाखू विक्रेत्यांकडून 8 हजार 400  रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजु टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

या पथकात नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील, जिल्हा सल्लागार डॉ. उमेश मुंडे, दंत शल्यचिकित्सक डॉ. महेश पोकळे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड, समुपदेशक अरविंद वाटोरे व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच  कंधार  पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  शेख व पोलीस नाईक प्रकाश टाकरस उपस्थित होते.  

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000




 वृत्त क्र. 575 

माजी सैनिकांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी 11 जुलै पर्यंत संपर्क साधावा 

नांदेड, दि. 10 जुलै :- सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांच्याद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट क च्या रिक्त पदांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्या माजी सैनिकांनी नाहरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी 11 जुलै पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने केले आहे. 

अधिक माहितीसाठी जिल्हा कल्याण संघटक मोबाईल नं. 8380873985, 8707608283 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 574 

88 वर्षापेक्षा वय जास्त असणाऱ्या

सैनिकांनी संपर्क साधावा 

नांदेड, दि. 10 जुलै :- नांदेड जिल्ह्यातील ज्या सैनिकांचे वय 88 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी योग्य कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये नोंद करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये ज्या माजी सैनिकांचे वय 88 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी आणि जर त्यांची प्रकृती ठिक नसेल तर त्यांच्या नातेवाईक किंवा वारसाने कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयात 12 जुलै पर्यंत नोंद करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी माजी सैनिक कल्याण समन्वयक मोबाईल नं. 8380873985, 8707608283 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

0000

 वृत्त क्र. 573 

दहावी, बारावी लेखीपरीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु  

नांदेड, दि. 10 जुलै :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये माध्यमिक वउच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीसोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर सकाळी 8 ते सायं 8 पर्यंत इयत्तादहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूरविभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूरविभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.  

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव श्रीमती भंडारी ए. आर.9422886101, ए. आर. कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिकसाठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं.8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं.9423777789 तर माध्यमिकसाठी एस.एस. काथार मो 8275043112, एस. एल. राठोड मो. 8830298158 या भ्रमणध्वनीवर संपर्क क्रमांक आहे. नांदेड जिल्ह्यासाठी संपर्क नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहेत.

00000

 वृत्त क्र. 572 

‍दिव्यांगानो मोफत संगणकिय

व व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घ्या 

नांदेड, दि. 10 जुलै :-  दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. या प्रशिक्षणासाठी गरजू दिव्यांगानी प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन मिरज शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे अधिक्षक यांनी केले आहे. 

प्रवेशासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. 

अभ्यासक्रमाचे नाव, शैक्षणिक पात्रता- सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथएम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) किमान इयत्ता 8 वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमसिंबल पंप सिंगलफेज, (इलेक्ट्रीक कोर्स) किमान इयत्ता 9 वी पास. वय 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो. 

सोई व सवलती- प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवण्याची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना. 

अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत – प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळीरोड, म्हेत्रेमळा, गोदड मळयाजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली-416 410 दु.क्र.0233-2222908 मोबाईल क्र. 9922577561, 9595667936 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट व प्रमाणपत्र, दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यांच्या झेराक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर  तज्ञ समितीद्वारे मुलाखती घेवून प्रवेश देण्यात येईल. माफक जागा असल्याने गरजू दिव्यांगानी लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 विभागीय माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध 

लातूर (विमाका) दि. 10 : विभागीय माहिती कार्यालय, लातूर येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्रीसाठी काढण्यात आली आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, त्यांनी त्यांचे लिफाफाबंद दरपत्रक


मा. उपसंचालक (माहिती),  विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दि. 18 जुलै 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी  दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील .


रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील.

 *******

 वृत्त क्र. 571  

नांदेड मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये : जिल्हाधिकारी

नांदेड दि. १० : हिंगोली शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या आज सकाळी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर 4.5 नोंद झाली आहे. हा अति सौम्य भूकंप असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व भूकंप संदर्भात अभ्यास करणाऱ्या भूकंपशास्त्र केंद्रीय विभागाकडून अधिक अभ्यास केला जात आहे.

भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन श्री. अभिजीत राऊत यांनी केले आहे.
00000


 


आज सकाळी जिल्ह्यात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याबाबत 
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निवेदन. 
नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर

जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती


हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीमसह

मराठवाडा, विदर्भात कुठेही जिवित किंवा वित्तहानीची माहिती प्राप्त नाही

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदन


भुकंप झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन न जाता

सतर्क राहून भुकंपकाळात बचाव उपाययोजना राबवाव्यात

--उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आवाहन

मुंबई, दि. 10 :- राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त झाली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  विधानसभेत दिली. 

विधानसभेत राज्य शासनाच्या वतीने निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची राज्य शासनाने गंभीर नोंद घेतली असून संबंधित जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच सर्व  प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र सतर्क राहून बचावासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. गावांमध्ये ज्या घरांवर पत्र्याचे छत आहे, त्यावर आधारासाठी ठेवलेले दगड काढून टाकावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्य शासन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या भूकंप आणि नुकसानीसंदर्भातील अधिकची माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

०००००००

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...