Wednesday, July 10, 2024

 वृत्त क्र. 577 

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड, दि. 10 जुलै :- जलसंधारण अधिकारी (स्‍थापत्‍य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्‍त पदाच्‍या फेरपरीक्षेकरिता,  परीक्षा केंद्राच्‍या परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत. ही परीक्षा नांदेड जिल्‍ह्यात आयन डिजिटल झोन आयडीझेड, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी गेट क्रमांक 18 आणि 22 नांदेड या परीक्षा केंद्रावर घेण्‍यात येणार आहे. 

भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी सदर  परीक्षा केद्रापासून 100 मीटरच्या परिसरात,  दि. 14, 15 व 16 जुलै 2024 रोजी  सकाळी 7 ते  रात्री  9 वाजेपर्यतच्‍या कालावधीत, परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स,एस.टी.डी., आय.एस.डी, भ्रमणध्वनी, फॅक्स,झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...