Saturday, August 17, 2024

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण #majhiladkibahinyojana #नांदेड






















 










 विशेष वृत्त क्र.  733 

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन

 

भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते 927 कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण

 

नांदेड दि. 17 ऑगस्ट : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती आहे. लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदार संघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतातअसे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

 

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकर सारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्याकेंद्र शासनाच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाजजो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगर परिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

 

 या कार्यक्रमाला  पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ.अजित गोपछडेआ. राजेश पवारआमदार डॉ. तुषार राठोडजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवालअतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरमाजी आमदार अमर राजूरकरमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकरश्रीजया चव्हाणरोहिदास जाधवअॅडवोकेट रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी)दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली)श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाज भूषणज्येष्ठ नेतेतसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

   

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केल्या जाईल. या मतदारसंघाने कायम चव्हाण कुटुंबावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन यावेळी दिले. अन्य मान्यवरांची ही यावेळी मार्गदर्शन झाले.

 

तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असूनभोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

 

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या  6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.

 

त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे  जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.

 

त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या   येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

 

त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढवबल्लाळ तांडामोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणाभोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्थाभोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामनगरपरिषदभोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणाभोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

0000





















 वृत्त क्र. 732

 

महाआयटी पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत

 

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर मिळणार स्वाधार योजनेचा लाभ

 

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अंतर्गत नांदेड शहरामध्ये मुलांची 2 आणि 2 मुलींची अशी एकूण शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहातील रिक्त जागावर प्रवेश देण्यासाठी महाआयटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर रिक्त जागावर प्रवेश मिळेलविशेष म्हणजे या पोर्टलवर वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 

वसतिगृहासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात नंबर नाही लागला तर पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही. आपोआप वसतिगृहात प्रवेश न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्याची नोंद होईल. त्यानंतर त्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती मिळेल. मात्रत्यासाठी वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून महाआयटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर पुन्हा स्वतंत्र अर्जाची गरज नाही. महाआयटी पोर्टलवरील लिंकचा वापर करून अर्ज करा.

 

नविन पोर्टल लिंकचा वापर करून व्यावसायिक अभासक्रमाच्या विध्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी प्रवेश करणे सुरू झाले आहे. नियमअटी व शर्ती यांची माहिती घेऊन विद्यार्थी अर्ज करू शकतात. वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्याकरिता व्यावसायिक पदाची पदविका प्रथम वर्षाततसेच थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज करता येईल.

 

महाआयटी पोर्टलवरील लिंक

https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनसाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सदर पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्यापरंतु प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.

 

अडचण वाटत असेल तर मार्गदर्शन घ्या

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठीतसेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत लिंकचा वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुखगृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत. काही अडचण आल्या तर मार्गदशन घ्या, असे समाज कल्याणचे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000000

 वृत्त क्र. 731 

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी

ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्ज 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मागविण्यात आली आहेत.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 6 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणान्या अंपगत्वअशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे (उदा :- चष्माश्रवणयंत्रट्रायपॉडस्टिक व्हिल चेअरफोल्डिंग वॉकरकमोड खुर्चीनि-बेसलंबर बेल्टसर्वाइकल कॉलर इत्यादी.) खरेदी करण्याकरिता राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजनासुरु केलेली असून पात्र रक्कम 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांचे बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणेसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणनांदेड कार्यालय व कार्यालय अधिनस्त तालुकाच्या ठिकाणी कार्यरत मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह व शासकिय निवासी शाळा येथे कार्यालयीन वेळेत पुढीलप्रमाणे दिलेल्या तालुकानिहाय वसतिगृह व निवासी शाळेस अर्ज सादर करावेत.

 

गुणवंत मुलाचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी तालुका नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बिलोलीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धर्माबादमागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह देगलूरमागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मुखेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हदगावमागासवर्गीय मुलाचे शासकीय वसतिगृह भोकर, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरी, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगाव, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूरमागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह नायगावअनु. जाती व नवबौद्ध मुलींची शासकिय निवासी शाळा माहूर येथील तालुकानिहाय वसतिगृह व निवासी शाळेस अर्ज सादर करता येतील.

 

अर्जासोबतची कागदपत्रे  

दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पुर्ण केलेली असावे. आधार कार्ड / मतदान कार्डराष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधीराष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसिलदार तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे बँक पासबुक झेरॉक्स. पासपोर्ट आकाराचे 2 फोटोउत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आत असावे. स्वयंघोषणापत्र CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमुद करण्यात यावे. वरील नमूद साधनांपैकी पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमुद करावी. ही कागदपत्रे पुर्ण करणारे लाभार्थ्यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत तालुका निहाय दिलेल्या ठिकाणी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000

 विशेष वृत्त क्र.  730 

केंद्रात व राज्यात महिला-भगीणींचे हीत बघणारे सरकार कार्यरत : गिरीश महाजन

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा भोकर येथून थाटात शुभारंभ

 

नांदेड (भोकर)दि. 17 ऑगस्ट : केंद्रात व राज्यात महिला भगिनींचे हित बघणारे त्यांचे बळकटीकरण सक्षमीकरण व सामाजिक मानसन्मान वाढवून मुख्य प्रवाहात आणणारे सरकार कार्यरत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यातीलच एक अभियान आहेअसे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकासपर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथून मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचवेळी नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम जिल्ह्यातील भोकर येथे आज थाटात संपन्न झाला. हजारो महिलांच्या उपस्थितीतील या कार्यक्रमांमध्ये राज्यातील शासन हे विविध योजनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात महिला भगिनींच्या पाठीशी आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला संदर्भात नवीन आर्थिक क्रांती असून यामुळे महिलांच्या सामाजिक सन्मानामध्ये वाढ झाली आहेप्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणखासदार डॉ. अजित गोपछेडेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवालअतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरमाजी आमदार अमर राजूरकरमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकरश्रीजया चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदममहिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारीयांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला आपल्या परंपरागत बंजारा पेहराव मध्ये आलेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्यांना प्राथमिक स्वरूपात प्रमाणपत्र ही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात महिलांनी राज्य शासनाच्या या योजनेबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

यावेळी पालकमंत्री म्हणालेकेंद्र व राज्यातील सरकारने महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना सुरू केल्या आहे. केंद्रात आलेल्या शासनाने दहा वर्षापूर्वी घरातील महिलांना स्वयंपाकाच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी उज्वला गॅस योजना सुरू केली. केंद्र सरकारने 20 कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला आहे. आम्ही राज्य सरकारने आणखी त्यामध्ये भर घातली असून आता महिलांना तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.महिलांना एसटी भाडे 50% माफ करण्यात आले आहे. राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाणार आहे. बचत गटाच्या  बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देण्यात येत असून सोळा हजार कोटींचा पतपुरवठा करण्यात आला आहे. हक्काचे घरप्रत्येकाला घर,प्रत्येक घरात शौचालय आणि आता प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

 

यावेळी उपस्थित महिलांना संबोधतांना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नसतील त्यांनाही ते मिळतील याबद्दल आश्वस्त केले.31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी असेल. त्यामुळे या संदर्भात कोणी काही गैरसमज पसरवत असेल तर त्याला बळी पडू नकाअसे आवाहन केले.मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा,बचत गट स्थापन करावेत असे आवाहनही केले. यावेळी त्यांनी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशी उपस्थित महिला समुदायाला विचारणा केली. ज्यांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्या सर्व महिलांना अर्ज करायला सांगा असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी यावेळी संबोधित केले. केंद्र व राज्य शासन महिलांसाठी नवनवीन योजना आणत असून त्या सर्व योजनांचा वापर भोकर पासून तर नांदेड पर्यंत सर्वांना मिळेल याची खात्री बाळगा. आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अजित गोपछडे श्रीजया चव्हाण यांनीही यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम यांनी केले.

000















मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा #नांदेड जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम महिलांच्या भरगच्च उपस्थितीत भोकर येथे झाला. भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...