Saturday, August 17, 2024

 वृत्त क्र. 732

 

महाआयटी पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत

 

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर मिळणार स्वाधार योजनेचा लाभ

 

नांदेड, दि. 17 ऑगस्ट : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अंतर्गत नांदेड शहरामध्ये मुलांची 2 आणि 2 मुलींची अशी एकूण शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहातील रिक्त जागावर प्रवेश देण्यासाठी महाआयटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज केल्यानंतर रिक्त जागावर प्रवेश मिळेलविशेष म्हणजे या पोर्टलवर वसतिगृहासाठी प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला असेल तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

 

वसतिगृहासाठी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला आणि वसतिगृहात नंबर नाही लागला तर पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करण्याची गरज नाही. आपोआप वसतिगृहात प्रवेश न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकडे विद्यार्थ्याची नोंद होईल. त्यानंतर त्यांना स्वाधार योजनेची शिष्यवृत्ती मिळेल. मात्रत्यासाठी वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून महाआयटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे. वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तर पुन्हा स्वतंत्र अर्जाची गरज नाही. महाआयटी पोर्टलवरील लिंकचा वापर करून अर्ज करा.

 

नविन पोर्टल लिंकचा वापर करून व्यावसायिक अभासक्रमाच्या विध्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी प्रवेश करणे सुरू झाले आहे. नियमअटी व शर्ती यांची माहिती घेऊन विद्यार्थी अर्ज करू शकतात. वसतिगृहात प्रवेश अर्ज भरण्याकरिता व्यावसायिक पदाची पदविका प्रथम वर्षाततसेच थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रवेश अर्ज करता येईल.

 

महाआयटी पोर्टलवरील लिंक

https://hmas.mahait.org प्रवेश अर्ज भरण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनसाठी 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी सदर पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्यापरंतु प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना या पोर्टलद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र पोर्टलवर शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.

 

अडचण वाटत असेल तर मार्गदर्शन घ्या

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठीतसेच स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत लिंकचा वापर करून तसेच स्थानिक गृहप्रमुखगृहपाल यांच्याकडे संपर्क साधून प्रवेश अर्ज भरावेत. काही अडचण आल्या तर मार्गदशन घ्या, असे समाज कल्याणचे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...