Sunday, June 13, 2021

 

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस

झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- गेल्या आठ दिवसांपासून राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे, परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे. 

सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनासाठी पेरणीच्या पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. किमान 80-100 मि.मी. पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 20 व्यक्ती कोरोना बाधित

तर 42 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 859अहवालापैकी  20 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 10 तर अँटिजेन तपासणीद्वारे 10 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 905 एवढी झाली असून यातील 87 हजार 960 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 503 रुग्ण उपचार घेत असून 6 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 897 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, लोहा तालुक्यात 4, बिलोली 1, धर्माबाद 1, देगलूर 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 2, मुखेड 1, हदगाव 1, नायगाव 1, किनवट 1, हिंगोली, मुदखेड 3 असे एकूण 20 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 42 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, मुखेड कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 5,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2, माहूर तालुक्यांतर्गत 3, भोकर तालुक्यांतर्गत 8, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 4, किनवट कोविड रुग्णालय 4 तर खाजगी रुग्णालयातील 9 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. 

आज 503 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  23, लोहा कोविड रुग्णालय 4, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय 5, देगलूर कोविड रुग्णालय 7,   हदगाव कोविड रुग्णालय 2,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 335, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 89, खाजगी रुग्णालय 18 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 116, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 131 खाटा उपलब्ध आहेत.

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 75 हजार 597

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 73 हजार 201

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 905

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 960

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 897

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-169

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 503

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6

00000

 लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस ; जिल्ह्यातील 94 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण


नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 14 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 10 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर व सिडको या 10 केंद्रावर कोविशील्डचा 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. या केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस दोन्ही गटासाठी श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, दशमेश हॉस्पिटल,कौठा, श्रावस्तीनगर अशा एकुण 7 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहेत. या ठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील दुसऱ्या डोससाठी दिली जाईल.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस प्राधान्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. येथे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 15 केंद्रांवर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 150 डोस तर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे कोव्हॅक्सिनचे 40 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींच्या दुसऱ्या डोससाठीच दिले जातील.

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे डोस उपलब्ध करुन दिले आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे पहिल्या डोसचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 12 जून पर्यंत एकुण 4 लाख 62 हजार 349 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 13 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 38 हजार 230 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 41 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 80 हजार 170 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...