Friday, February 15, 2019


अल्पसंख्याक आयोगाचे
उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा दौरा
नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज. मो. अभ्यंकर हे मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने सकाळी 5.10 वा. नांदेड येथे आगमन. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींच्या भेटी. सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांचे सोबत बैठक. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत निवासी उपजिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक, निरंतर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांची आढावा बैठक. दुपारी 12.30 वा. नांदेड येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील.
अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती, संघटनांच्या तक्रारीचे निराकरण
नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील तक्रारग्रस्त व्यक्तींना भेटून त्यांच्या तक्रारी एकून घेणार आहेत. त्याशिवाय त्यांनी दिलेल्या निवेदनाबाबत व समक्ष दिलेल्या माहितीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तक्रारदारांच्या समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतची त्यांची भुमिका समजून घेणार आहेत. संबंधीत अल्पसंख्याक व्यक्तीवर अन्याय होत असल्याचे दिसून आल्यास त्याबद्दलची नियमाधीन समयबद्ध कार्यवाही करण्यास संबंधीत अधिकाऱ्यास आदेशित करणार आहेत. तसेच अल्पसंख्याक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालकांच्या समस्यांबाबतही सुनावणीची कार्यवाही केली जाणार आहे.
अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती व संघटनांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्यावतीने आयोजित केलेल्या या समस्या निराकरणाच्या उपक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अवर सचिव यांनी केले आहे.
000000


राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या उमेदवारांना सुचना
नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- 2019 ही रविवार 17 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तसेच दुपारी 3 ते सायं 5 वाजेपर्यंत या कालावधीत (दोन सत्रात) नांदेड जिल्हा केंद्रावर 50 शाळा महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. आयोगामार्फत दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
उमेदवारांनी परीक्षेला येतांना प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधारकार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट व स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र व मुळ ओळखपत्राची छायाप्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
उमेदवारांनी परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी, स्मार्ट वॉच, डिजीटल वॉच, मायक्रोफोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, परिगणक, ब्ल्युटूथ इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.
परीक्षेत मास-कॉपी / गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर तसेच संगनमताने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत.
परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचारी यांचेकडून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी उपकेंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान दिड तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आयोगमार्फत प्रत्येक परीक्षा केंद्रावर हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे.
आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त व कलम 144 प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000


उत्तर प्रदेशचे जलसिंचन, अल्पसंख्याक  
राज्यमंत्री सरदार बलदेव सिंघ यांचा दौरा  
नांदेड दि. 15 :- उत्तर प्रदेश राज्याचे जलसिंचन व अल्पसंख्याक विकास विभागाचे राज्यमंत्री सरदार बलदेव सिंघ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्ली येथून विमानाने सायं 5.05 वा. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व रात्री मुक्काम.
मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन व नांदेड शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
बुधवार 20 फेब्रुवारी 2019 रोजी श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून दुपारी 3.20 वा. हैद्राबादकडे प्रयाण करतील.
000000


सहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक स्कुलच्या
  नवीन इमारत संकुलाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन
नांदेड दि. 15 :-  किनवट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक स्कुल सहस्त्रकुंड येथील नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते शनिवार 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून होणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना सहस्त्रकुंड येथे ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
या इमारतीचे बांधकाम सन 2016-17 मध्ये सुरु करण्यात आले आहे. या बांधकामास 24 महिण्याचा कालावधी देण्यात आला होता. या इमारतीसाठी 15 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम 10 हजार 862 चौ.मी. इतके करण्यात आले आहे. शाळा इमारत बांधकाम अंतर्गत शाळा इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, भोजनगृह, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळांचे मैदान, अभ्यंगतासाठी शौचालय, विद्युतघर, खेळाडुसाठी मैदानावर चैजिंग रुम (शौचालयासह), वाहनतळ, अंतर्गत पक्के रस्ते, संरक्षक भिंत, ट्रिट लाईट, पाणी साठवण अंडरग्राउट टाकी 1.5 लक्ष लिटर. या शाळा बांधकामासाठी 15 एकर जमिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जमिनीवर 24 कोटी 16 लाख रुपये बांधकाम अंदाज पत्रकास मंजुरात प्राप्त असून इमारत संकुल बांधकाम पुर्ण झालेले आहे.
एकलव्य रेसिडेसिंयल पब्लीक स्कुल ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत वर्ग मान्यता आहे. या शाळेची एकुण प्रवेश क्षमता 420 असून 210 मुले व 210 मुलींना प्रवेश देण्यात येतो. अमरावती विभागातील एकुण 13 जिल्ह्यासाठी चिखलदरा व सहस्त्रकुंड या दोन शाळामध्ये विद्यार्थ्यांना पात्रता परिक्षा घेऊन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. या शाळेचा आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लाभ होणार आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...