Wednesday, July 8, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’


 

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - २०२६’

वृत्त क्रमांक 

शल्यतंत्र विभागातर्फे ॲनोरेक्टल लेझर शस्त्रक्रिया शिबीर व कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

 

नांदेड दि. 8 जुलै :- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड तथा Neo-Laser Company, Mumbai यांच्या संयुक्त विद्यमाने शल्यतंत्र विभागाच्या वतीने रुग्णालयात लेझर अॅनो-रेक्टल शस्त्रक्रिया शिबिर व कार्यशाळा शनिवार 7 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. या शिबिरामध्ये एकूण 22 रुग्णांवर अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञानाद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

 

सदर शिबीर व कार्यशाळा शल्यतंत्र विभागप्रमुख डॉ. विजय उखळकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार आयोजीत करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता मा. डॉ. ना.सु. गंगासागरे व Neo- Laser Company तर्फे प्रशांत शियाले व त्यांचे सहकारी आणि लेझर तज्ञ डॉ. चंद्रकांत देवसरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

शिबीरात भुलतज्ञ डॉ गिरीश भोपळे यांनी सलग 22 रूग्णांना भूल देवून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमिलकंठवार, विभागीय सहकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मंजुषा पाटील, शल्यतंत्र विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, पदव्युत्तर विद्यार्थी, परिचारिका, ऑपरेशन थिएटर कर्मचारी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

या शिबिरामुळे रुग्णांना अत्याधुनिक, सुरक्षित व प्रभावी लेझर उपचारांचा लाभ मिळाला. सर्वात महत्वाचे म्हणजे या शिबिरासाठी शल्य तंत्र विभागातील सर्व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत होते व शस्त्रक्रियेनंतरही सर्व रुग्णांची काळजी घेण्यासाठी संपूर्ण शल्य तंत्र विभाग अथक परिश्रम घेईल.

 

या शिबिरादरम्यान शल्यतंत्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना लेझर अॅनो-रेक्टल शस्त्रक्रियेचे प्रत्यक्ष (Hands-on) प्रशिक्षण देण्यात आले. शस्त्रक्रियेतील आधुनिक लेझर तंत्रज्ञान, त्याची कार्यपद्धती व प्रत्यक्ष शस्त्रक्रियेचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

"सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे लेझर अॅनो-रेक्टल शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. भविष्यातही अशाच सामूहिक प्रयत्नातून रुग्णांना अत्याधुनिक, दर्जेदार आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प कायम राहील असे शल्य तंत्र विभाग प्रमुख यांनी घोषित केले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे शल्यतंत्र विभागातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

00000





वृत्त क्रमांक 

इतर मागासवर्गीय महामंडळाच्या आणि उपकंपन्यांच्या विविध कर्ज योजनेचा लाभा घ्यावा

 

नांदेड दि. 8 जुलै :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या उपकंपनीच्या विविध 14 महामंडळामार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगिन कल्याणासाठी बेरोजगारांसाठी स्वयंम उद्योगासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. सदर कर्ज योजना ही बँकेमार्फत असून लाभार्थ्याने महामंडळाच्या वेबसाईडवर ऑनलाईन अर्ज www.msobcfdc.org या संकेतस्थळावर भरावा. तसेच सदर योजनेचा लाभ हा इतर मागासवर्गीय समाजातील व्यक्तीने जास्तीतजास्त घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.

 

या उपकंपनीत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज कैशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचेंद्र दादरे (लोणारी) अर्थिक विकास महामंडळ, संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलींग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ या 14 महामंडाळाचा समावेश आहे.

 

इतर मागासवर्गीय प्रवार्गातील गरजु व कुशल व्यावसायिक व्यक्तींना कृषी सलग्न व पारंपारीक उपक्रम, लघु उद्योग, मध्यम उद्योग उत्पादन, व्यापर विक्री सेवाक्षेत्र इत्यादी व्यवसायासाठी या महामंडळाच्या योजनांची माहिती पुढील प्रमाणे देण्यात यावी.

 

रुपये 1 लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना  

या योजनेमध्ये अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान 500 पेक्षा जास्त असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. 1 लक्ष पेक्षा कमी असावे, परतफेडीचा कालावधी 48 समान मासिक हप्त्यांमध्ये राहिल, नियमीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेत व्याज अदा करावे लागणार नाही परंतू थकित झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकरण्यात येईल.

 

20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना

या योजनेमध्ये 75 टक्के रक्कम ही बँकेची असून त्यावरील व्याज हे बँकेच्या नियमाप्रमाणे राहील 20 टक्के रक्कम ही महामंडळची असून त्यावर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज आकारण्यात येते व 5 टक्के सहभाग हा लाभार्थ्यांचा आहे, या योजनेची कर्ज मर्यादा रुपये 5 लाखापर्यंत असून परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा समान 60 हप्त्याचा आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा रू. 15 लक्ष पर्यतची आहे. सदर योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेत कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष पर्यत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल तसेच लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.

 

गट कर्ज व्याज परतावा योजना  

सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येत असून कर्ज मर्यादा रू. 10 लक्ष ते 50 लक्ष पर्यंतची आहे या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे असावे तसेच गटातील लाभार्थ्यांनी यापुर्वी महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच इतर मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदार संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत ), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणीसाठी जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना  

सदर योजना बँके मार्फत राबविण्यात येत असून कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशातर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी कर्ज मर्यादा रू. 10 ते 20 लक्ष पर्यतची आहे. या योजनेत महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे, अर्जदाराची कोटोबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा रू. 8 लक्ष असावी, विद्यार्थी बारावी 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरनानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.

 

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना

ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोक संचालित साधन केंद्र (CMRC) मार्फत राबविल्या जात असून इतर मागास प्रवार्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास प्रथम टप्यात रू. 5 लक्ष पर्यत कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेच्या निषाप्रमाणे तसेच कर्ज रक्कमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम ( 12 टक्केच्या मर्यादित) व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी संपर्कासाठी पत्ता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर नांदेड 431605 (०२४६२) २२०८६५ वेबसाइट - www.msobcfdc.org येथे संपर्क साधावा.

0000

वृत्त क्रमांक 

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) : कामात मागे असलेल्या BLO यांच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी ; कामात गती आणण्याचे निर्देश

नांदेड दि. ८ जुलै :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंद सुनिश्चित करणे, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे तसेच मतदारांच्या तपशीलांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी उस्मानशाही मिल, सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 6 मधील कामात अपेक्षित प्रगती नसलेल्या 20 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व त्यांच्या पर्यवेक्षकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसांत कामात लक्षणीय प्रगती करण्याचे निर्देश देत, कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष BLO यांच्या कामाची पाहणी केली. त्यांनी मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेण्यास सांगितला तसेच मोबाईल ॲपद्वारे त्याचे तत्काळ डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष पडताळणी केली. यावेळी त्यांनी भविष्यात कोणत्याही मतदान केंद्र क्षेत्राला अचानक भेट देऊन BLO प्रत्यक्ष काम कसे करत आहेत, याची तपासणी करण्यात येईल. भेटीदरम्यान संबंधित BLO किंवा त्यांचे सहाय्यक अनुपस्थित आढळल्यास अथवा कामात समाधानकारक प्रगती दिसून न आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ) संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री. स्वामी व श्री. सानप तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  यांनी सांगितले की, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह मतदार यादी ही मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचा भक्कम पाया आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देत या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा आणि निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

0000








 प्रेस नोट

सीधे नियुक्त अधीनस्थ अधिकारी (डीएएसओ-98) बुनियादी प्रशिक्षण क्रमांक-98 के प्रशिक्षणार्थियों का दीक्षांत समारोह दिनांक 08 जुलाई 2026

केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, केरिपुबल, मुदखेड के प्रांगण में आज दिनांक 08 जुलाई 2026 को सीधे नियुक्त अधीनस्थ अधिकारी प्रशिक्षणार्थियों का भव्य दीक्षांत सह शपथ ग्रहण समारोह का आयोजन किया गया।

इस समारोह के मुख्य अतिथि श्री आर. गोपाला कृष्णा राव, भा.पु.से., पुलिस महानिरीक्षक/प्राचार्य, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, केरिपुबल, मुदखेड ने परेड की सलामी ली।

डीएएसओ बुनियादी प्रशिक्षण क्रम संख्या-98 के 57 सीधे नियुक्त अधीनस्थ अधिकारी प्रशिक्षणार्थी, जो देश के विभिन्न राज्यों से बल में भर्ती होकर आये हैं, को 48 सप्ताह का कठिन बुनियादी प्रशिक्षण दिया गया। प्रशिक्षण के दौरान इन्हें शारीरिक दक्षता के साथ-साथ विभिन्न अस्त्र-शस्त्रों, युद्ध कला व इनके ड्यूटी से संबंधित कार्यों का प्रशिक्षण दिया गया।

इस बल में सीधे नियुक्त अधीनस्थ अधिकारियों की अहम भूमिका है, जो विपरीत परिस्थितियों में अपने जान की बाजी लगा कर दुर्गम से दुर्गम क्षेत्रों में कार्य करते हैं, वहीं सीधे नियुक्त अधीनस्थ अधिकारी प्रशासनिक कार्यों को भी बखूबी अंजाम देते हैं।

डीएएसओ प्रशिक्षणार्थी के दीक्षांत समारोह के अवसर पर, श्री आर. गोपाला कृष्णा राव, भा.पु.से., पुलिस महानिरीक्षक/प्राचार्य, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, केरिपुबल, मुदखेड ने उपस्थित सभी आगंतुकों का स्वागत व अभिनन्दन किया। कमाण्डेंट श्री वेद प्रकाश त्रिपाठी द्वारा उप निरीक्षक/जीडी प्रशिक्षणार्थियों को बल की सदस्यता की शपथ दिलाई गई। यह शपथ इनके इस संकल्प और विश्वास का प्रतीक है कि ये देश की आन, बान और शान की रक्षा के लिए कोई भी कुर्बानी देने को तत्पर हैं चाहे वे भारत वर्ष के किसी भी कोने में पदस्थ क्यों न हों।

श्री आर. गोपाला कृष्णा राव, भा.पु.से., पुलिस महानिरीक्षक/प्राचार्य, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, केरिपुबल, मुदखेड ने इन नव प्रशिक्षित अधीनस्थ अधिकारियों को उनके सफलतापूर्वक इस कठिन प्रशिक्षण को पूरा करने के लिए बधाई दी। अपने भाषण में महानिरीक्षक/प्राचार्य ने ड्यूटी के दौरान कर्तव्यों का निर्वहन करते समय नए पास आउट अधीनस्थ अधिकारियों के सामने आने वाली चुनौतियों पर जोर दिया। महानिरीक्षक/प्राचार्य ने विभिन्न विषयों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले प्रशिक्षुओं को ट्रॉफी प्रदान की। परेड के दौरान प्रशिक्षण कर्मचारियों ने विभिन्न प्रदर्शनों के माध्यम से अपने कौशल का प्रदर्शन किया। प्रशिक्षुओं के माता-पिता और परिवार के सदस्यों के अलावा, नांदेड़ जिले के वरिष्ठ अधिकारी, अन्य गणमान्य नागरिक एवं केंद्रीय विद्यालय के छात्र भी इस भव्य परेड के साक्षी बने।

इस अवसर पर नांदेड़ से आई टीम द्वारा मलखम्ब एवं इस संस्थान के पी. टी.  स्टाफ द्वारा काता, UAC, योगा, आत्मरक्षा सम्बन्धी तकनीकों  का प्रदर्शन किया गया | साथ ही इस अवसर पर सीआरपीएफ सीटीसी मुदखेड के मुख्य प्रशिक्षण अधिकारी श्री वेद प्रकाश त्रिपाठी सहित नांदेड़ जिले के विभिन्न विभागों के वरिष्ठ अधिकारी, क्षेत्र के गणमान्य नागरिक, विभिन्न स्कूलों के शिक्षक और बच्चों सहित बड़ी संख्या में लोगों ने भाग लिया।

धन्यवाद

00000





वृत्त क्रमांक 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर 12 जुलै रोजी नांदेड दौऱ्यावर

नांदेड दि. 8 जुलै : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर या रविवार, दि. 12 जुलै, 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

रविवार, दि. 12 जुलै रोजी बेंगळुर येथून विमानाने सकाळी 9.30 वाजता नांदेड विमानतळावर आगमन त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. 

सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 2 वा. कुसुमताई चव्हाण पुरस्कार वितरण सोहळयास उपस्थिती. स्थळ:- शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड. 

दुपारी 4.30 नांदेड कारागृहाला भेट. सायं. 6 वा. श्री हुजूर साहिब गुरुद्वारास भेट. सायं 7 वा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांच्यासोबत बैठक.  

सोमवार 13 जुलै रोजी सकाळी 10 वा. नांदेड येथून विमानाने गाझियाबादकडे त्या प्रयाण करतील. 

00000

 वृत्त क्रमांक 

जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीसाठी

अशासकीय सदस्य व जिल्हा समन्वयक पदांसाठी अर्ज मागविले

नांदेड, दि. 8 जुलै : अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याच्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच समाजामध्ये जनजागृती, प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे.

समाजामध्ये रुजलेल्या अनिष्ट, अघोरी व अमानुष प्रथा, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींमुळे अनेक प्रकारचे शोषण, छळ व जीवितहानी होत असल्याचे दिसून येते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच समाजाचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ सुधारण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात येत आहे.

शासनाच्या निर्देशानुसार या समितीवर 7 अशासकीय सदस्य (त्यामध्ये किमान 2 महिला) तसेच 1 जिल्हा समन्वयक यांची नियुक्ती राज्यस्तरीय पीआयएमसीचे अध्यक्ष व सहअध्यक्ष यांच्या मान्यतेने आणि समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या सहमतीने करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्या कार्यालयात शासकीय कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाला नवी गती: समग्र प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्यभर दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिरे

 राज्यात ११६ प्रशिक्षण बॅचेस पूर्ण; ५,०१० अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड दि. 8 जुलै :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या सनियंत्रणाखाली सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आयुष्मान भारत - समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्यव्यापी दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' या अभियानाला अधिक प्रभावीपणे गती देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण राज्यात ११६ प्रशिक्षण बॅचेस यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, ५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा सहभाग

या प्रशिक्षणामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांमधील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आशा पर्यवेक्षक आणि आशा स्वयंसेविका अशा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, अद्ययावत आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामकाजातील सुधारणा या प्रशिक्षणातून दिल्या जात आहेत.

प्रात्यक्षिकांवर विशेष भर

प्रशिक्षणाचा दर्जा, एकसमानता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अनुभवी मेंटर्स तसेच जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ वर्गातील व्याख्यानांपुरते मर्यादित न ठेवता, प्रात्यक्षिकांवर आधारित अध्यापन आणि समुदाय सहभागावर आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थींना थेट गावांमध्ये पाठवून गृहभेटी, नागरिकांशी आरोग्य संवाद, कुटुंबांना आरोग्यविषयक मार्गदर्शन, आजारांचे लवकर निदान, जोखीम असलेल्या व्यक्तींची ओळख आणि गरजेनुसार संदर्भ सेवा याविषयीचा प्रत्यक्ष अनुभव दिला जात आहे.

आरोग्य सेवा पॅकेजेसचे सविस्तर प्रशिक्षण

आयुष्मान भारत अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या समग्र प्राथमिक आरोग्य सेवेच्या १३ सेवा पॅकेजेसचे या प्रशिक्षणात सविस्तर प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये खालील सेवांचा समावेश आहे:

माता व बाल आरोग्य

नवजात शिशु सेवा

किशोरवयीन आरोग्य

कुटुंब नियोजन

संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन

मानसिक आरोग्य

वृद्धापकाळातील आरोग्य सेवा

आपत्कालीन आरोग्य सेवा

नेत्र व कर्ण आरोग्य

मौखिक आरोग्य

योग व आयुष उपचार पद्धती

आरोग्य संवर्धन, गुणवत्ता सुधारणा आणि डेटा व्यवस्थापन

अहवाल लेखन आणि समुदायधारित आरोग्य सेवा वितरण

आरोग्याची लोकचळवळ उभारण्याचा संकल्प

"माध्यमातून प्रत्येक गावात आरोग्याची लोकचळवळ उभारण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा संकल्प असून, त्यासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि संवेदनशील मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. या प्रशिक्षणानंतर आयुष्मान आरोग्य मंदिरांमार्फत नागरिकांना अधिक दर्जेदार, सर्वसमावेशक, सुलभ आणि रुग्णाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध होतील," असा विश्वास सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यभर राबविण्यात येत असलेले हे प्रशिक्षण अभियान प्राथमिक आरोग्य सेवा बळकट करण्यास, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला चालना देण्यास आणि प्रत्येक गाव 'आरोग्यसंपन्न गाव' बनविण्याच्या उद्दिष्टपूर्तीस निश्चितच मोलाचे योगदान देणार आहे.

00000

वृत्त क्रमांक 

केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, मुदखेड येथे डीएएसओ-98 प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत व शपथविधी सोहळा संपन्न

नांदेड, दि. 8 जुलै :- केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, मुदखेड येथे थेट नियुक्त अधीनस्थ अधिकारी (डीएएसओ-98) मूलभूत प्रशिक्षणक्रमाच्या 57 प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत व शपथविधी सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी पोलीस महानिरीक्षक तथा प्राचार्य, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय, मुदखेड आर. गोपाला कृष्ण राव (भा.पो.से.) हे होते. त्यांनी आकर्षक परेडची सलामी स्वीकारून प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

देशातील विविध राज्यांतून केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट नियुक्त झालेल्या 57 अधीनस्थ अधिकारी प्रशिक्षणार्थ्यांनी 48 आठवड्यांचे मूलभूत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. या कालावधीत त्यांना शारीरिक क्षमता विकास, विविध अस्त्र-शस्त्रांचे प्रशिक्षण, युद्धकौशल्य, अंतर्गत सुरक्षा, प्रशासकीय जबाबदाऱ्या तसेच कर्तव्य पालनासंबंधी विविध विषयांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी कमांडंट वेद प्रकाश त्रिपाठी यांनी उपनिरीक्षक (जीडी) प्रशिक्षणार्थ्यांना दलाच्या सदस्यत्वाची शपथ दिली. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी तसेच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रसेवेसाठी तत्पर राहण्याची प्रतिज्ञा प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी केली.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री आर. गोपाला कृष्ण राव यांनी नवप्रशिक्षित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सेवाकाळात येणाऱ्या आव्हानांचा धैर्याने सामना करीत शिस्त, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा जपत देशसेवा करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान विविध विषयांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा त्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. परेडदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आपल्या कौशल्याचे प्रभावी सादरीकरण केले.

या दीक्षांत सोहळ्यास प्रशिक्षणार्थ्यांचे पालक व कुटुंबीय, आरटीसी सीआरपीएफ, लातूरचे पोलीस उपमहानिरीक्षक अमीरिल हसन अन्सारी, केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाचे मुख्य प्रशिक्षण अधिकारी श्री वेद प्रकाश त्रिपाठी, नांदेड जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मान्यवर नागरिक, विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #MahaDGIPR #GovernmentScheme #Fa...