Sunday, November 22, 2020

 

85 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू  

25 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 22 :- रविवार 22 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 85 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 50 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 35 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 25 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या एकुण 3 हजार 603 अहवालापैकी  3 हजार 467 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता  20 हजार 06 एवढी झाली असून यातील  18  हजार 894 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 374 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 17 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 22 नोव्हेंबर 2020 रोजी कंधार तालुक्यातील तिरकसवाडी येथील 76 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 544 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1, लातूर येथे संदर्भीत 1 असे एकूण 25 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 33, नांदेड ग्रामीण 2, भोकर तालुक्यात 2, किनवट 2, बिलोली 5, नायागव 1, लातूर 1, हिंगोली 2, यवतमाळ 2 असे एकुण 50 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 14, नांदेड ग्रामीण 5, बिलोली तालुक्यात 2, धर्माबाद 1, कंधार 3, मुखेड 2, देगलूर 4, हदगाव 1, माहूर 2, परभणी 1 असे एकुण 35 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 374 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 21, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 35, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 175, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 5, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 10, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 6, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 4, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 16, कंधार कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 16, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, खाजगी रुग्णालय 45 आहेत.  

रविवार 22 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 78 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 36 हजार 987

निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 12 हजार 639

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 06

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 894

एकूण मृत्यू संख्या- 544

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.45 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-23

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-28

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-972

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-374

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-17. 

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

00000

 

इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा

2 डिसेंबरपासून सुरु होणार 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरु करताना करावयाचे नियोजन, शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या आणि त्याचे अहवाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबींवर आम्ही प्राधान्याने लक्ष केंद्रित केंद्रीत केले. सर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता स्थगित करण्यात आल्या असून त्या 2 डिसेंबरपासून सुरु करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी संयुक्त दिलेल्या प्रसिद्धी पत्राद्वारे स्पष्ट केले.  

नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या 858 शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या 70 शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण 8 हजार 115 शिक्षक आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले. शिक्षकांचे नाव, त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करुन अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या. 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शाळारंभाची पूर्वतयारी यासंदर्भाने डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र अंबेकर यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीबाबत सूचना केल्या होत्या. 

जिल्ह्यातील 2 हजार 282 शिक्षकांची अँटीजन टेस्ट करण्यात आल्या असून 4 हजार 982 शिक्षकांची तपासणी करणे सुरु आहे. यापैकी 927 जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. तर 2 हजार 702 जणांची चाचणी सुरु आहे. आतापर्यंत 40 टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासणी करुन घेण्यात येत आहे. 

येत्या 1 डिसेंबरपर्यंत सर्व स्थिती सुरळीत करून 2 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले आहे.

*****

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...