Tuesday, January 16, 2024

वृत्त क्र. 48

सण-उत्सवात ध्वनी वापराची अधिसूचना निर्गमीत 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक आदीच्या वापराबाबत श्रोते गृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2024 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या 15 दिवसांत ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केली आहे.  

या अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये माळेगाव यात्रा, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन 1 मे, 2 दिवस गणपती उत्सव (पहिला दिवस व अनंत चर्तुदर्शी), नवरात्री उत्सव (पहिला दिवस व अष्टमी व नवमी) दिवाळी (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद, ख्रिसमस, 31 डिसेंबर, उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल. 

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दि. 16 ऑगस्ट  2016 रोजी दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे.

0000

 

 वृत्त क्र. 50 

कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी

जिल्ह्यात 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिमेचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 17 व 18 जानेवारी रोजी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिम कालावधीत जात प्रमाणपत्र अर्ज उपलब्ध करुन देणे व आवश्यक कागदपत्रासाठी ग्रामसेवकतलाठीमंडळ अधिकारी मदत करतीलअसे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यात कुणबीमराठा-कुणबीकुणबी-मराठा नोंदी शोधण्याची कार्यवाही प्राधान्याने सुरु आहे. कुणबी असल्याबाबतच्या नोंदी सर्व सामान्य नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी नोंदीची यादी ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे. आढळून आलेल्या सर्व नोंदी जिल्हा संकेतस्थळावरही अपलोड केल्या आहेत. कुणबीकुणबी-मराठामराठा-कुणबी नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु आहे.

विविध कार्यालयात 1967 पूर्वीच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीअंती आढळून आलेल्या नोंदीचा अहवाल वेळोवेळी सादर केला जात आहे. नागरिकांसाठी जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठीआढळून आलेल्या नोंदीची यादी तलाठी व ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

 

ग्रामपंचायत कार्यालयात जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विहित नमुना अर्ज उपलब्ध करुन देण्याची व भरुन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्ण भरलेला अर्ज जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा सामाईक सुविधा केंद्रात दाखल करण्यासाठी अर्जदारांना मदत करण्यासाठी ग्रामसेवकतलाठीमंडळ अधिकारी मदत करणार आहेत.

 

नागरिकांनी प्रथमत: त्यांचेशी संबंधित नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nanded.gov.in/en/talukawise-kunbi-records/ संकेतस्थळावर आपले पूर्वजांचे नावांचा शोध घ्यावा. संबंधित नोंदी सापडल्यानंतर संबंधित कार्यालयातून नोंदीची प्रमाणित प्रत मिळवावी. उदा. मोडी भाषेतील नमुना 33 व 34 साठी संबंधित तालुक्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयप्रवेश निर्गम उतारा संबंधीत शाळेतून तर खासरा पत्रकक पत्रकपाहणी पत्रककुळ नोंदवही इत्यादी अभिलेखांतील आवश्यक नोंदीच्या प्रमाणित प्रती संबंधित तहसिल कार्यालयातून विहित शुल्क भरणा करुन प्राप्त करुन घ्याव्यातअसे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

0000

 वृत्त क्र. 49 

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023 साठी

प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन 

नांदेड, (जिमाका) दि. 16 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in    www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

पुरस्कारांची माहिती

अ.क्र

पुरस्काराचे नाव

पारितोषिक

1.

अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय)

1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक)

2.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

3.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

4.

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

5.

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

6.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

7.

पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

8.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

9.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

10.

समाजमाध्यम पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

11.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

12.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

13.

दादासाहेब पोतनीस पुरस्कार, (नाशिक विभाग)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह  प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

14.

अनंतराव भालेराव पुरस्कार, (छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

15.

आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

16.

नानासाहेब परूळेकर पुरस्कार, (पुणे विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

17.

शि.म.परांजपे पुरस्कार, (कोकण विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

18.

ग.गो.जाधव पुरस्कार, (कोल्हापूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

19.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

20.

ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, (नागपूर विभाग)

51 हजार रुपये (मानचिन्ह  प्रशस्तीपत्र)

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...