Friday, December 4, 2020

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन

7 डिसेंबरला कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020  संकलन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे  करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे. कोवीड-19 चा प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साध्यापणाने होणार असून या कार्यक्रमास आमंत्रित  कार्यालय प्रमुख,  माजी सैनिक संघटना अध्यक्ष व विरनारी, विरमाता, विरपिता यांनीच उपस्थित रहावे, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.   

सन 2019-20 मध्ये नांदेड जिल्ह्याला संकलनाचे उद्दीष्ट 35 लाख 30 हजार रुपये इतके देण्यात  आले होते. ते जिल्ह्याचे 124 प्रतिशत पुर्ण करुन 43 लाखा 82 हजार रुपये एवढा निधी शासनास जमा केला आहे. या कार्याची दखल घेत शासनाने नांदेड जिल्हयास उत्कृष्ट निधी संकलनासाठीचे स्मृतीचिन्ह प्रदान  केले आहे.  

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2019 साठी उत्कृष्ट संकलन करणाऱ्या जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख कर्मचाऱ्यांसह संस्था तसेच दानशूर व्यक्तींना या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रके व पुस्तक स्वरुप भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्यसाधून जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिताविशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. 

00000


 26 कोरोना बाधितांची भर तर 42 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 4 :- शुक्रवार 4 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 26 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 17 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 9 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 42 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आजच्या 1 हजार 54 अहवालापैकी 1 हजार 10 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 20 हजार 516 एवढी झाली असून यातील 19 हजार 436 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 336 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 550 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 12, हदगाव कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, मुखेड कोविड रुग्णालय 5, बिलोली तालुक्यांतर्गत 2 असे एकूण 42 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 5, मुखेड तालुक्यात 10, भोकर 1, नायगाव 1 असे एकुण 17 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, मुखेड तालुक्यात 3, हदगाव 1 असे एकुण 9 बाधित आढळले.
जिल्ह्यात 336 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 33, मुखेड कोविड रुग्णालय 26, किनवट कोविड रुग्णालय 2, हदगाव कोविड रुग्णालय 3, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 75, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 116, खाजगी रुग्णालय 22 आहेत.
शुक्रवार 4 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 184, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 72 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 55 हजार 663
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 30 हजार 993
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 20 हजार 516
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 19 हजार 436
एकूण मृत्यू संख्या- 550
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-623
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-336
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-15.
आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
000000

 

बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा

उत्तीर्ण उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  अनूसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बार्टीच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकाचवेळी एकरकमी रक्कम 50 हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेकरिता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत असे, आवाहन बार्टीचे पुणे येथील महासंचालक, धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता युपीएससी दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देते. संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 दि.4 आक्टोंबर 2020 रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोंबर 2020 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यांची नोंद घ्यावी असेही आवाहन केले आहे.

00000

 

जिल्ह्यात एड्स दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  जिल्ह्यात सुमारे 6 हजार 374ॲक्टीव्ह एचआयव्ही रुग्ण उपचार घेत आहेत. यात पुरुष 2 हजार 953, महिला 2 हजार 938 , टीजी 12, बालक 460 आदींचा समावेश आहे. यासर्व रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देवून मोफत बस प्रवास, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदि सुविधांचा लाभ पोहचावा. यादृष्टीने एनजीओमार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

जागतिक एड्स दिनानिमित 1 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री. गरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रूग्णालय नांदेड अंतर्गत एचआयव्ही, एड्स जनजागरणासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागतिक एड्स दिनानिमित जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जागतिक एकता आणि सामुहिक जबाबदारी याद्वारे आपण एचआयव्ही, एड्स विरूध्द जनजागृती करून एड्सचा धोका टाळु शकतो असे आवाहन केले आहे. 

यामध्ये सोशल मिडीया वरती एचआयव्हीची माहिती देणारे विविध व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले. तसेच मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे कोविड 19 चे नियम पाळुन एचआयव्ही टेस्टींग शिबिर घेण्यात आले. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मास्क डिझाईनिंग, जिआयएफ, मिम्स, सेल्फी विथ स्लोगन आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नेहरू युवा केंद्रातील युवा क्लबच्या माध्यमातुन जिल्ह्यातील वीस गावामध्ये एचआयव्ही,एड्स बद्दल जनजागरणाकरीता वॉल पेंटींग आणि पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केले. गरोदर मातापासुन बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण शुन्यावर आणता येईल. जागतिक एड्स दिनानिमित एचआयव्हीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देवुन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रायवेट हॉस्पीटल (पीपीपी) ज्यांनी गरोदर मातासाठी उत्कृष्ट काम केले. त्यांना देखील प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देवुन गौरविण्यात आले .

00000



  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...