Friday, December 4, 2020

 

बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा

उत्तीर्ण उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य 

नांदेड (जिमाका) दि. 4 :-  अनूसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020 उत्तीर्ण झाले आहेत. तसेच बार्टीच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकाचवेळी एकरकमी रक्कम 50 हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेकरिता जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन पात्रतेचे स्वरुप तपासून, अर्ज डाऊनलोड करुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्जामध्ये असलेल्या ई-मेलवर 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत असे, आवाहन बार्टीचे पुणे येथील महासंचालक, धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता युपीएससी दरवर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देते. संघ लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा-2020 दि.4 आक्टोंबर 2020 रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 23 ऑक्टोंबर 2020 रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यांची नोंद घ्यावी असेही आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...