Wednesday, April 22, 2020


त्रैमासिक माहिती ईआर-1 मध्ये
30 एप्रिल पर्यंत भरण्याचे आस्थापनांना आवाहन
नांदेड दि. 22 :- सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 नियम 1960 अन्वये मार्च 2020 अखेर संपणाऱ्या मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहीत मुदतीत जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांन ऑनलाईन गुरुवार 30 एप्रिल पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.   
सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे ) कायदा 1959 नियम, 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरु, स्त्री एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावरु ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
            मार्च-2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड या कार्यालयाद्वारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून पूर्ण  प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
सर्व आस्थापनांना यापूर्वीच युझर नेम पासवर्ड या कार्यालयाकडून देण्यात आल आहेत.  त्याचा वापर रु प्रत्येकाने या विभागाच्या www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर लॉगीन करावे आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.
सदर तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम गुरुवार 30 एप्रिल 2020 ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तव्दतच प्रत्येक आस्थापनांनी आपापला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तत्काळ अद्यावत करावी.
यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी  nandedrojgar@gmsil.com यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
000000

फोटो ओळी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रामध्ये कोरोना संसर्ग लाळ तपासणी प्रयोगशाळेला भेट देवुन पाहणी करतांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी, डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के आदी दिसत आहेत. (छाया : विजय होकर्णे नांदेड)








फोटो ओळी :-
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंक्य्युबेशन केंद्रामध्ये कोरोना संसर्ग लाळ तपासणी प्रयोगशाळेला भेट देवुन पाहणी करतांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी, डॉ.  विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक विजय कुमार मगर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के आदी दिसत आहेत. (छाया : विजय होकर्णे नांदेड)
000000


कोरोनाचा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह ;
जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करावे
आतापर्यंत 444 नमुने निगेटीव्ह ; 50 नागरिकांचा तपासणी अहवाल बाकी
नांदेड दि. 22 :- नांदेड शहरातील पिरबुरहान भागातील 64 वर्षीय कोरोना संशयित एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. जनतेने घाबरुन न जाता, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 754 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 242 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 65 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 119 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 635 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 51 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 500 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 444 नमुने निगेटीव्ह आले असून 50 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 78 हजार 150 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
00000


निर्देशित वेळेतच व्यवसाय करावा
अन्न व्यवसायिकांनी स्वत:बरोबर
कामगारांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी
नांदेड दि. 22 :- किराणा, भुसार, घाऊक / किरकोळ अन्न आस्थापना यांच्या व्यवसायाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आली असून अन्न व्यवसायिकांनी निर्देशित वेळेमध्येच आपला व्यवसाय करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचे ठिकाणी स्वत:चे व कार्यरत कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहिल यादृष्टीने दक्षता घ्यावी. चेहऱ्यावर मास्क तसेच हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावयाचा आहे. व्यवसायाच्या ठिकाणी कामगार, ग्राहक यांच्या संबंधात सुरक्षित अंतर किमान एक मीटरचे असावे. व्यवसाय परिसरात एकावेळी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत याबाबत स्वत: उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी करावी. ग्राहकांच्या बाबतीत योग्य अंतर ठेवयाचे असून अन्न हाताळणीपूर्वी सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे. हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. चेहऱ्यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्न पदार्थाची विक्री करण्यात येणार नाही याबाबत त्यांना सुचित करावयाचे आहे.
पार्सल सेवा / घरपोच सेवा देणारी रेस्टारन्ट यांच्याकडे काम करणारी व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्क वापरणे तसेच हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे क्रमप्राप्त आहे.  त्याचबरोबर संबंधित अन्न पदार्थ तयार करणारे व पुरवठा करणारे कर्मचारी (डिलिव्हरी बॉय ) यांची वैद्यकिय तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. 
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी असेही आदेशित केले आहे की, कन्फेक्शनरी, फरसाण व मिठाई आस्थापनाना दिलेली दि. 19 एप्रिल 2020 रोजीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी व त्याचे चालक, कामगार यांनी पुढील आदेशापर्यंत व्यवसाय करु नये याची त्यांनी नोंद घ्यावी.
अन्न व्यावसायिकांनी त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेच्या बंधनासहित आरोग्याच्यादृष्टीने सर्व उपाययोजना करुन व्यवसाय करावाचा आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन 2005 आणि भा. द. वि. 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व त्याअनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
000000

सुधारीत वृत्त


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   
सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल
यांची नांदेड आकाशवाणीवर शुक्रवारी मुलाखत
नांदेड दि. 22 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याविषयी सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची शुक्रवार 24 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता आकाशवाणी नांदेड केंद्रावरून मुलाखत प्रसारित होणार आहे.  वरिष्ठ निवेदक गणेश धोबे यांनी ही मुलाखत घेतली आहे, अशी माहिती आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी नंदादीपक बट्टा यांनी दिली आहे.
00000

सुधारीत वृत्त


महानगरपालिका हद्दीतील पिरबुऱ्हाणनगर
व परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित

·         नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे,
·         अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना मास्क,स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा
·         महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांचे नागरिकांना आवाहन

नांदेड दि. 22 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत पिरबुऱ्हाणनगर या क्षेत्रातील  कोव्हीड-19 चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नियमानुसार पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कन्टेनमेंट झोन (Containmet Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेथील नगारिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत.
कोणत्याही नागरिकांने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये नमुद केल्यानुसार अत्यावश्यक कामाशिवाय, वैध कागदपत्राशिवाय व आवश्यक कारणाशिवाय तसेच मास्क न घालता बाहेर निघाल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
कोव्हीड 19 अनुषंगाने नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दीन 9823012456, डॉ. बळीराम भुरके मो. 9881120873, डॉ. मिर्झा फरदुतुल्लाह बेग मो. 9011000950 या नंबर वर संपर्क साधावा,   
महानगरपालिका क्षेत्रातील पीरबुरहान नगर येथील एका 64 वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झालेली असून त्यांचा स्‍वॅब घेण्यात आलेला आहे. संबंधीत व्यक्तीच्या परिवारातील 14 सदस्यांना एनआरआय निवास येथे ठेवण्यात आले आहे. मनापाच्या आरोग्य विभागाने त्या व्यक्तींची चौकशी केली असून त्या व्यक्तीच्या संपर्कातील 50 व्यक्तींना एनआरआय निवास कोव्हीड-19 केअर सेंटर येथे क्वारंटाईन केले असून त्यांचा स्वॅब तपासणीचे नमुने पाठविले आहे.  
कन्टेनमेंट झोनमधील दहा हजार नागरिकांची आज तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे मनपा यंत्रणेमार्फत 14 दिवस तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना बाधीत व्यक्तीने खाजगी दवाखान्यामध्ये तपासणी केल्यामुळे तेथील दोन दवाखान्यातील डॉक्टरांना व तेथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर दोन्ही दवाखाने सील करण्यात आले आहेत.
तसेच त्यांच्या संपर्कात आलेला दुधवाला, गॅसवाला यांचे सुद्धा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मनपा क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नांदेडमध्ये आजपर्यंत कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नव्हता तो आज आढळून आला आहे. कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगचे ) पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.
00000


साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे,
स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या अधीन राहून
कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रांतर्गत
सर्व कापूस खरेदी केंद्रास परवानगी
नांदेड दि. 22 :- जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.
देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने 15 एप्रिल रोजी सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार कृषि उत्पन्न बाजार समितीमधील कृषि शेतमालाची खरेदी-विक्री व कृषि शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव (पणन)  यांनी 17 एप्रिल रोजी भारतीय कापूस निगम (CCI) व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित (MSCCGMF) मुंबई यांच्यामार्फत कापसाची हमी भावाने खरेदी सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवार 21 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या कापूस खरेदी केंद्रांना साथरोग संसर्ग प्रतिबंधात्मक आदेशांचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी दिली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी महसूल प्रशासनाने दिलेल्या ऑनलाईन लिंकवर 25 एप्रिल 2020 पर्यंत प्राथमिक नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघुसंदेश पाठविण्यात येणार असून लघुसंदेशामध्ये नमूद दिनांकास शेतकऱ्यांने सात-बारावरील पीकपेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे.
एखाद्या शेतकऱ्यांच्या नावावर यापुर्वी कापूस विक्री झालेली असल्यास त्यांचे नावावर पुन्हा कापूस खरेदी केली जाणार नाही. Non FAQ दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीने पणन संचालक  पुणे यांनी तालुकास्तरावर तालुका उप / सहायक निबंधक, सहकारी संस्था, कापूस पणन महासंघाचे प्रतिनिधी  व बाजार समितीचा सचिव यांनी समिती गठीत केली आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर साथसोवळे सामाजिक अंतर (Social distance) व स्वच्छतेचे पालन करुन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे आवाहन, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...