Wednesday, April 22, 2020

सुधारीत वृत्त


महानगरपालिका हद्दीतील पिरबुऱ्हाणनगर
व परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित

·         नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे,
·         अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना मास्क,स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा
·         महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांचे नागरिकांना आवाहन

नांदेड दि. 22 :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत पिरबुऱ्हाणनगर या क्षेत्रातील  कोव्हीड-19 चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नियमानुसार पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कन्टेनमेंट झोन (Containmet Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेथील नगारिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत.
कोणत्याही नागरिकांने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये नमुद केल्यानुसार अत्यावश्यक कामाशिवाय, वैध कागदपत्राशिवाय व आवश्यक कारणाशिवाय तसेच मास्क न घालता बाहेर निघाल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
कोव्हीड 19 अनुषंगाने नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद बदीयोद्दीन 9823012456, डॉ. बळीराम भुरके मो. 9881120873, डॉ. मिर्झा फरदुतुल्लाह बेग मो. 9011000950 या नंबर वर संपर्क साधावा,   
महानगरपालिका क्षेत्रातील पीरबुरहान नगर येथील एका 64 वर्षीय नागरिकाला कोरोनाची बाधा झालेली असून त्यांचा स्‍वॅब घेण्यात आलेला आहे. संबंधीत व्यक्तीच्या परिवारातील 14 सदस्यांना एनआरआय निवास येथे ठेवण्यात आले आहे. मनापाच्या आरोग्य विभागाने त्या व्यक्तींची चौकशी केली असून त्या व्यक्तीच्या संपर्कातील 50 व्यक्तींना एनआरआय निवास कोव्हीड-19 केअर सेंटर येथे क्वारंटाईन केले असून त्यांचा स्वॅब तपासणीचे नमुने पाठविले आहे.  
कन्टेनमेंट झोनमधील दहा हजार नागरिकांची आज तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यापुढे मनपा यंत्रणेमार्फत 14 दिवस तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोना बाधीत व्यक्तीने खाजगी दवाखान्यामध्ये तपासणी केल्यामुळे तेथील दोन दवाखान्यातील डॉक्टरांना व तेथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर दोन्ही दवाखाने सील करण्यात आले आहेत.
तसेच त्यांच्या संपर्कात आलेला दुधवाला, गॅसवाला यांचे सुद्धा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मनपा क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, नांदेडमध्ये आजपर्यंत कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नव्हता तो आज आढळून आला आहे. कोरोना बाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगचे ) पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   94 ​ राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक नांदेड दि २४ :- गेल्या तीन...