राज्य रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ
नांदेड (जिमाका) दि. 12 :- ‘राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023’ चे उदघाटन प्रादेशिक परिवहन कार्यालयात नुकतेच करण्यात आले. दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी श्रीछत्रपती शिवाजी विदयालय सिडको संस्थेचे संस्थाचालक राजेश महागावे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे डॉ.महेमुद यांची उपस्थिती होती.
यावेळी देशातील, राज्यातील व जिल्हयातील अपघाताची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली. अपघातामुळे अनेक कुटूंबे उध्दस्त झालेली आहेत. याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये एक समिती नेमण्यात आलेली असून या समितीने प्रत्येक प्रत्येक वर्षी किमान 10 टक्के अपघात कमी करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे सांगितले. फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजून चालावे (Walk on Right) याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते एका नविन उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. या नविन संकल्पनेची जनजागृती संपूर्ण जिल्हयामध्ये करण्यात येणार आहे. या राज्य रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन अविनाश राऊत यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल आवाड यांनी केले. आभार प्रदर्शन अनिल डुब्बेवार यांनी मानले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अमोल आवाड, मनोज चव्हाण, गणेश तपकिरे, भरत गायकवाड, अभिजित कोळी व सहा.मोटार वाहन निरीक्षक धोंडीबा आवाड, अनिल टिळेकर, कज कंतेवार, डुब्बेवार लिपीक कर्मचारी, मुख्य लिपिक राजेश गाजुलवाड, रोहित कंधारकर, गजानन शिंदे, दिलीप गाडचेलवार, श्रीमती जयश्री वाघमारे, नरेश देवदे, क. लिपीक प्रदीप बिदरकर, संजय कोंगलवार, मोतिराम पोकले, छत्रपती शिवाजी विद्यालय सिडको येथील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे 50 जणांनी रक्तदान केले. शिबिरासाठी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविदयालयाचे पथक उपस्थित होते.
00000