Friday, October 11, 2019


विद्यार्थ्यांनी चित्र, निबंध पत्राद्वारे केले पालकास मतदान करण्याचे आवाहन

नांदेड,दि. 11:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता स्वीप कक्ष 087 दक्षिण नांदेडमधील सर्व शाळांमध्ये मतदान जागृती याविषयी इयत्ता पहिली ते चौथी वर्गासाठी चित्रकला स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवीसाठी निबंध स्पर्धा आणि पत्रलेखन स्पर्धा दि. 1 ऑक्टोबर, 2019 रोजी घेण्यात आल्या .
विद्यार्थ्यांनी मतदार जागृती संदर्भात सुंदर चित्रे काढून रंगविली तसेच पत्रातून पालक सर्व नातेवाईक यांनी दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाजी विद्यालय सिडको 195 विद्यार्थी, होलीसिटी पब्लिक स्कूल 110 विद्यार्थी, नरसिंह विद्यामंदिर 130 विद्यार्थी , जिल्हा परिषद हायस्कूल कासरखेडा 175 विद्यार्थी, जिल्हा परिषद हायस्कूल 210 विद्यार्थी जिल्हा परिषद हायस्कूल 195 विद्यार्थी यांनी चित्रकला, निबंध पत्रलेखन कार्यक्रमात भाग घेतला. यात सहभागी विद्यार्थ्यांना मोंमेटम प्रमाणपत्र देण्याचा तहसीलदार यांचा मानस आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून मतदान जागृतीच्या या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अरुण जऱ्हाड यांनी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी यांच्या कल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
स्वीप टिम प्रमुख नयना पवार, आचमे सारिका, कर्वेडकर कौशल्या , येरेकर वंदना, मुसमे राजकुमार , हाके पंकज , अनिल बसवदे यांनी उपस्थित राहून या स्पर्धा ठिकांणाना भेटी दिल्या सहकार्य केले.
0000




कमी मतदान टक्केवारी असणाऱ्या
मतदान केंद्रासाठी स्वीप टिमचे उपक्रम  

नांदेड,दि. 11:- विधासभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी 87 नांदेड दक्षिण मतदार संघात स्वीप टिमद्वारे कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रावर बुथची तपासणी करुन तेथील सुविधांची पाहणी करण्यात आली. आदर्श मतदान केंद्रासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
स्वीप टिम पथकाने नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या दहा मतदान केंद्राच्या भागात विशेष कार्यक्रम घेवून लाऊड स्पीकरद्वारे घोषवाक्य देत मतदान जागृती रथ संपूर्ण विभागात फिरवण्यात आला, मतदान जागृतीचे काम करण्यात आले. या मतदार संघामध्ये मल्टिपर्पज हायस्कूल , 67,68,69, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 28 , खालसा हायस्कूल 11 , नांदेड वाघाळा मनपा स्कूल 57, शिवाजी विद्यालय 217, प्रज्ञानिकेतन 145, एनडब्ल्युएमपी वाचनालय किलारोड 140, कळगीधर स्कूल 45 अशा सर्व बुथ असणाऱ्या विभागातील नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनखाली तहसीलदार अरुण जऱ्हाड, नायब तहसीलदार उर्मिला कुलकर्णी स्वीप टिम प्रमुख नयना पवार तसेच मुसाने राजकुमार , पंकज हाके, सारिका आचमे, वंदना वाघमारे, कर्वेडकर कौशल्या अनिल बस्वदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0000






86 - नांदेड विधानसभा उत्‍तर मतदार संघात
मतदार जनजागृती नाटीका सादर
नांदेड,दि. 11:- 86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी स्‍थापीत स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 11 ऑक्‍टोबर, 2019 रोजी शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे राष्‍ट्रमाता इंदिरा हायस्‍कुल, नांदेड विधी महाविद्यालय, नांदेड येथील विद्यार्थी चमू यांनी मतदार जनजागृती नाटीका सादर केली. नाटीकेच्‍या माध्‍यमातून  मतदान का करायला हवे? ही बाब विद्यार्थ्‍यांनी पटवून दिली. तसेच सर्वांनी आवर्जुन मतदान करण्‍याचे आवाहन केले. त्‍यास उपस्थितांनी टाळ्यांच्‍या गजरात प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी  रोहयो सदाशिव पडदूणे यांनी नाटीकेत सहभागी मुलांना पुष्‍पगुच्‍छ देवून कौतुक केले. 
या कार्यक्रमास तहसिलदार सं.गां.यो श्रीमती वैशाली पाटील, सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी मिटकरी आर डब्‍ल्यू, तहसीलदार सामान्‍य प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार श्री.पाटे हे उपस्थित होते.
पथनाट्य सादरीकरण करण्‍यासाठी श्री नरवाडे मुख्‍याध्‍यापक शिक्षकवृंद, राष्‍ट्रमाता इंदिरा हायस्‍कुल, नांदेड प्राचार्य, विधी महाविद्यालय, नांदेड यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाचे नियेाजन 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, प्रसाद शिरपूरकर, श्री गणेश रायेवार, श्रीमती सारीका आचमे, श्रीमती कविता जोशी श्रीमती अनघा जोशी यांनी केले.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...