Friday, October 11, 2019



मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न
मतदान अधिकारी यांनी निवडणुकीचे काम निष्पक्षपणे, चोखपणे करावे
--- निवासी उपजिल्‍हाधिकारी - डॉ. सचिन खल्‍लाळ

नांदेड, दि.11:- सार्वत्रीक निवडणुक-2019 अंतर्गत 86-नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघामध्‍ये नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या मतदान केंद्राध्‍यक्ष, प्रथम मतदान अधिकारी ईतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण डॉ. शंकरराव चव्‍हाण सभागृह, नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आले होते.
या प्रशिक्षणास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली             डॉ. सचिन खल्‍लाळ, निवासी उपजिल्‍हाधिकारी, नांदेड यांनी मतदान अधिकारी यांनी निवडणुकीचे काम निष्पक्षपणे, चोखपणे करावे असे दुसऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. तसेच सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना पी.पी.टी.व्‍दारे प्रशिक्षण प्रत्‍यक्ष ई.व्‍ही.एम. व्‍ही.व्‍ही.पॅट हताळणी करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) सदाशिव पडदुणे यांनी प्रशिक्षण दिले.
            या यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली पाटील, प्रसाद कुलकर्णी, आर.डब्‍लु. मिटकरी, कक्ष प्रमुख नायब तहसिलदार सुनिल माचेवाड, विजयकुमार पाटे, श्रीमती संजिवणी मुपडे, प्रिया जांबळेपाटील, गट शिक्षण अधिकारी रुस्‍तुम आडे, अभियंता सुनिल देशमुख, सर्व क्षेत्रीय अधिकारी, मास्‍टर ट्रेनर सचिन राका, विकास देशमुख यांचे व्‍यासपिठावर उपस्थिती होती.  
निवडणुक निर्णय अधिकारी, 86-नांदेड उत्‍तर वि.स.म.सं. कार्यालयातील अव्‍वल कारकुन गणेश नरहिरे, गोपाल धसकनवार, बालाजी बंगरवार, गिरिष येवेते, रामेश्‍वर सावते,  सुचीता बोधगिरे, विद्या सुरुगवाड, एस.के. शहाणे, मनिषा वांगीकर, संतोष गज्‍जेवार, एस.व्हि. पेद्देवाड, माधव देमगुंडे, सुनिल माडजे, दिपक कुलकर्णी, गणेश सोनटक्‍के, नागेश स्‍वामी, माधव पवार, आनंदा कांबळे, विशाल पेंडकर, रोशनसिंह ग्रंथी, दत्‍तात्र्य लिंबेकर, रविकांत दहिवाल, अनिल धापसे, बाळासाहेब भराडे, नामदेव धांडे, अनिता काळे, विजयकुमार चौथवे, ज्‍योती कदम, दिपक गुरनुळे तलाठी सय्यद मौसिन आदिनी प्रशिक्षण यशस्‍वी करण्यासाठी प्रयत्‍न केले.
            या प्रशिक्षणास अनुपस्थित असलेल्‍या मतदान केंद्राध्‍यक्ष, प्रथम मतदान अधिकारी ईतर मतदान अधिकारी यांना लोक प्रतिनिधीत्‍व कायदा 1950 चे कलम 134 अन्‍वये नोटीस काढण्‍यात आली असुन संबंधीतास 24 तासाच्‍या आत खुलासा सादर करण्‍यास सांगीतले आहे. विहीत मुदतीत खुलासा सादर केल्‍यास संबधीतांविरुध्‍द नियमानुसार फौजदारी कारवाई करण्‍याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहे. सदर प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍यासाठी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, नायब तहसिलदार, क्षेत्रिय अधिकारी, मास्‍टर ट्रेनर, अव्‍वल कारकुण, मंडळ अधिकारी, लिपीक तलाठी यांनी परीश्रम घेतले.    
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...