Friday, October 11, 2019



86 - नांदेड विधानसभा उत्‍तर मतदार संघात
मतदार जनजागृती नाटीका सादर
नांदेड,दि. 11:- 86- नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी स्‍थापीत स्‍वीप कक्षाचे माध्‍यमातून दिनांक 11 ऑक्‍टोबर, 2019 रोजी शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे राष्‍ट्रमाता इंदिरा हायस्‍कुल, नांदेड विधी महाविद्यालय, नांदेड येथील विद्यार्थी चमू यांनी मतदार जनजागृती नाटीका सादर केली. नाटीकेच्‍या माध्‍यमातून  मतदान का करायला हवे? ही बाब विद्यार्थ्‍यांनी पटवून दिली. तसेच सर्वांनी आवर्जुन मतदान करण्‍याचे आवाहन केले. त्‍यास उपस्थितांनी टाळ्यांच्‍या गजरात प्रतिसाद दिला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी  रोहयो सदाशिव पडदूणे यांनी नाटीकेत सहभागी मुलांना पुष्‍पगुच्‍छ देवून कौतुक केले. 
या कार्यक्रमास तहसिलदार सं.गां.यो श्रीमती वैशाली पाटील, सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी मिटकरी आर डब्‍ल्यू, तहसीलदार सामान्‍य प्रसाद कुलकर्णी, नायब तहसिलदार श्री.पाटे हे उपस्थित होते.
पथनाट्य सादरीकरण करण्‍यासाठी श्री नरवाडे मुख्‍याध्‍यापक शिक्षकवृंद, राष्‍ट्रमाता इंदिरा हायस्‍कुल, नांदेड प्राचार्य, विधी महाविद्यालय, नांदेड यांनी सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाचे नियेाजन 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ स्विप कक्षातील रुस्‍तुम आडे, प्रसाद शिरपूरकर, श्री गणेश रायेवार, श्रीमती सारीका आचमे, श्रीमती कविता जोशी श्रीमती अनघा जोशी यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...