Monday, January 13, 2025

 वृत्त क्रमांक 46

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रमाला महसूल विभागाचा सक्रीय प्रतिसाद

100 दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील रस्ताविषयक अडचणींचा होणार निपटारा 

शेतकऱ्यांनी 25 जानेवारीपर्यत अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेड दि. 13 जानेवारी :- सामान्य नागरिकांचे जीवन सुकर, सहज व प्रशासकीय स्तरावर अडथळा विरहित होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसातील ७ सुत्री कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून शेत शिवारातील रस्ते व त्या संदर्भातील अडचणीला या मोहिमेत सोडवण्याचे प्राधान्य देण्यात आले आहे.

सामान्य  नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी १०० दिवसांचा ७ कलमी कृती कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात कृती कार्यक्रमाच्यात अमंलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून या कार्यक्रमांतर्गत सामान्य नागरिकांशी संबंधित असलेली कामे १०० दिवसांची विशेष मोहिम राबवून पुर्ण करण्या्त येणार आहेत. 

आपल्या् गावातील गाडी रस्ते, पाणंद, शिवरस्तेे, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग हे अतिक्रमण किंवा इतर कारणामुळे  बंद झालेले असल्यास या रस्त्यावरील अतिक्रमण,अडथळा दूर करण्या्साठी शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदाराकडे २५ जानेवारी, २०२५ पर्यंत रितसर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

समृध्द  व शाश्ववत शेती विकासासाठी शेती व्यनवस्थापन जलदगतीने होणे आवश्य्क आहे. अनेक ठिकाणी जून्या  काळातील गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्तेथ/शेतरस्ते/शिवार रस्ते/शेतावर जाण्याचे पायमार्ग वहीवाटीचे अभावी अतिक्रमीत झालेले आहेत, अरुंद झालेले आहेत. त्यातमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे,  देखरेख करणे  याकामी अडचण निर्माण होत असते. क्वचित ठिकाणी रस्ते, वहिवाटीच्या कारणामुळे वादविवाद निर्माण होवून न्या‍यालयीन प्रकरणे उद्भवतात. संबंधित शेतकऱ्यांचे वेळेबरोबरच आर्थिक नुकसान व मानसिक त्रास संभवतो.  शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे शेत रस्ताविषयक अडचणींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी आपल्या जिल्हयात कालबध्द मोहिमेची आखणी करण्याात आली आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा, असे प्रशासनाने केले आहे

अशी आहे मोहिम- 

शेताकडे जाणारे गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्ते /शेतरस्ते‍/शिवार रस्ते/शेतावर जाण्याचे पायमार्ग अतिक्रमण / अडथळा मुक्ते करण्यादसाठी संबंधित तहसीलदार यांचेकडे २५ जानेवारी, २०२५ पर्यंत अर्ज करावेत. 

26 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तहसीलदार हे प्राप्त अर्जांची स्वतंत्रपणे नोंद घेतील. प्राधान्यक्रमानुसार वर्गवारी करतील व पथक गठीत करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे व स्थळ पाहणी करुन आवश्यनकतेनुसार आदेश निर्गमित करतील. 

15 फेब्रुवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्व गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्ते /शेतरस्तेर/शिवाररस्ते /शेतावर जाण्याचे पायमार्ग १०० टक्के अतिक्रमण / अडथळामुक्तब करण्या चे प्रशासनाचे नियोजन आहे.         

 जिल्ह्यातही शंभर दिवसांचे नियोजन 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जानेवारी रोजी बैठक घेऊन या संदर्भात सात सुत्री कार्यक्रम जाहीर केला आहे त्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील जिल्ह्यात शंभर दिवसांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात महसूल विभागात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात येत असून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.

00000



वृत्त क्रमांक 45

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

                                                                                                                                                                  नांदेड दि. 13 जानेवारी :- इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या आभासी जगापासून दूर राहून स्वत:वर विश्वास ठेवून यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या काक्रमासाठी पदमिनी इंटरप्रायजेसचे उद्योजक हर्षद शहा, रामनाथ तुप्तेवार, अरुणजी फाजगे, प्राध्यापक श्रीमती परमिंदरकौर महाजन, राहूल नारायण बंग, व्याख्याते सोपान कदम यांची उपस्थिती होती. दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिन, उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कु. प्रतिमा गोवंदे हिच्या स्वागतगीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या व मनपाचे उपायुक्त रमेश चवरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही उद्योगाशी निगडीत प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संधीचा जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थीनी लाभ घ्यावा, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिली.  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही औद्योगिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रसिध्द असलेली संस्था आहे. स्वामी विवेकानंदाची जयंती  12 जानेवारी रोजी आहे. स्वामी विवेकानंद हे भारताचे महान आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जातात त्यांचे विचार आदर्श आजदेखील लाखो युवकांना मार्गदर्शक आहेत. युवकांना प्रेरीत करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, नेत्वृत्व गुण, क्षमता यासाठी त्यांचे विचार प्रेरक असल्याची माहिती  संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी दिली. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन एस.एम राका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. दासवाड, के.टी. भोसीकर, एस.एम. खानजोडे, पी.व्ही. पांचाळ, कांबळे, जी.जी. शेख, राष्री  य सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एम.जी. कलबंरकर तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

00000

 वृत्त क्रमांक 44

सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  

 केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड कार्यालयाचा उपक्रम 

नांदेड १३ जानेवारी - केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने सायन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय युवा दिननिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये मार्गदर्शन, वक्तृत्व्य  स्पर्धा, सेल्फीकबुथ आदींचा समावेश करण्याात आला. 

देशभरात दिनाक 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हमणुन साजरा करण्या्त येत असतो.  यानिमीत्त आठवडाभर विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.  दिनांक 13  जानेवारी रोजी येथील स्वामी  रामानंद‍ तिर्थ यांनी स्थापन केलेल्या सायन्स कॉलेजमध्ये  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. शिंदे, उपप्राचार्या डॉ. अरूणा शुक्ला , केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्यी अधिकारी सुमित दोडल, प्रमुख वक्ते प्रा.डॉ. गजानन डोणे,  श्रीमती रोहीणी माने आदींची प्रमुख उपस्थीती होती. 

कार्यक्रमांच्या  प्रारंभी प्रा. गजानन डोणे  यांनी “मला समजलेले स्वामी विवेकानंद” या विषयावर उपस्थित विदयार्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये स्वा्मी विवेकानंद यांच्या जिवनप्रवासासोबतच आचरणावर प्रकाश टाकाला. त्यांच्या साध्या  आणि प्रभावी राहणीमानाबददल चे विचार उदाहरणासह मांडले. यामध्ये स्वामी विवेकानंद परदेशात शिकत असतांनांच्या प्रसंगाची उदाहरणे देखील आपल्या मार्गदर्शनातून डॉ. डोणे यांनी दिली. मार्गदर्शनांच्या शेवटी युवकांना भौतीकवाद आणी मोबाईल सारख्याच उपकरणांपासून दुर राहण्याचे आवाहन डॉ. गजानन डोणे यांनी  आपल्या मार्गदर्शनातून केले. 

श्रीमती रोहीणी माने यांनी “मला समजलेल्या मां  जिजाऊ” या विषयावर युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना श्रीमती माने यांनी मां जिजाऊ केवळ शिवरायांच्याा आई तर होत्या च परंतू एक थोर समाज सुधारक देखील होत्या. त्यांचे अंधश्रध्दा निर्मुलन कार्याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे श्रीमती माने यांनी सांगीतले. आपल्या घरात शिवबा जन्माला यायचा असेल तर आगोदर मां जिजाऊ होणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन श्रीमती रोहीणी माने यांनी केले. यानंतर महाविदयाचे  प्राचार्य डॉ. एल.बी. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. 

मार्गदर्शनाच्याा कार्यक्रमानंतर विदयार्थांच्या  सहभागातून “सद्याच्या स्थीातीमध्ये् युवकांपुढील समस्या  व आव्हाने” आणि “हे जिवन सुंदर आहे या युवकांची भुमिका” या विषयावर वक्तृसत्वी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविदयाच्या 25 पेक्षा जास्ती विदयार्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले. 

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त लावण्यात आलेले सेल्फी बुथ सर्व विधार्थ्यांनी  आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे प्रास्तााविक केंद्रीय संचार ब्यूरो चे प्रसिद्धी अधिकारी सुमित दोडल यांनी केले तर सुत्रसंचलन  प्रा. डॉ. रेखा वाडेकर यांनी केले.

०००००











 वृत्त क्रमांक 43

नवीन तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

9 फेब्रुवारीपर्यंत महारेशीम अभियानाचे आयोजन

नांदेड दि. 13 जानेवारी :-  सन 2024-25 मध्ये समुहाने मनरेगा, सिल्क समग्र 2 योजनेअंतर्गत तसेच वैयक्तीक नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महारेशीम अभियान 2025 दिनांक 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. 

तरी नवीन तुती लागवड करण्यासाठी ईच्छूक असलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रामाकृष्णा इमारत, दुसरा मजला, एमएफ होंडा शोरुमच्या बाजूला, जॉन डिअर ट्रक्टर सर्व्हिस सेंटरच्या समोर हिंगोली रोड, नांदेड दूरध्वनी क्रमांक 9763689032, 9423437026, 7588151237, 7798213333 वर संपर्क करावा.  तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती, कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 42

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर सुरु

नवीन अर्ज करण्यासाठी 15 जानेवारीपर्यत मुदतवाढ

 नांदेड दि. 13 जानेवारी :-  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. 

 शासन निर्णय क्र.बीसीएच/प्र.क्र.२९३/शिक्षण-२, दि.26 डिसेंबर 2024 च्या निर्णयान्वये राज्यात दिवसेंदिवस वाढत आसलेली व्यावसायीक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत आसलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतीगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही व वसतीगृह सुरु करुन तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. त्यामुळे  तालुकास्तरावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.  या योजनेसाठी सन 2024-25 या वर्षासाठी अर्ज करण्यासाठी पात्र विध्यार्थ्यास करण्यासाठी  15 जानेवारी 2025 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पुढील निकषाप्रमाणे अर्ज करावयाचे आहेत. 

लाभाचे स्वरूप:- या योजने अंतर्गत  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम भोजन भत्ता 23 हजार, निवास भत्ता 10 हजार, निर्वाह भत्ता 5 हजार रुपये, प्रति विद्यार्थी एकूण देय रक्कम दोन सत्र 10 महिन्यासाठी 38 हजार रुपये राहील. वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. (वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल).

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष/सूचना:-

विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास  विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्याने नांदेड जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी विध्यार्थ्यानी अर्ज करणे आवश्यक आहे . परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.  शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करतांना संबंधीत विद्यार्थ्यांने अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमुद करणे बंधनकारक असेल.

विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत/शेडयुल्ड बँकेत खाते उघडले आहे. त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील तसेच तालुक्यातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.  तसेच केंद्रशासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल. त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षीक उत्पन्न मर्यादा त्या त्या प्रमाणे लागु राहील. साधारणत: दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. तसेच ते कार्यान्वयीत नसल्यास गृहपाल/ सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची मुभा राहील. अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यास स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 30 नोव्हेंबर पर्यंत राहिल. मात्र ज्या विद्यार्थ्यांचा निकाल उशीरा लागल्याने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया उशीरा होईल, अशा विद्यार्थ्यांना  महाविद्यालयातील प्रवेशानंतर एका महिण्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृहात मिळालेला प्रवेश रद्य करुन म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करुन स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रथमत: वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तदनंतर गुणानुक्रमेच स्वाधार योजनेचा लाभ अनुद्येय राहील. सदर योजनेसाठी अनु.जाती प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender) पात्र असतील.

शैक्षणिक निकष:-

सदर विद्यार्थी इयत्ता  ११ वी,१२ वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका/नगरपालीका/ग्रामपंचायत /कटक मंडळे यांच्या हद्यीत आहेत त्या महानगरपालीकानगरपालीका/ग्रामपंचायत /कटक मंडळे/ तालुक्यातील रहीवासी नसावा. तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून ०५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी सुद्धा  या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. विद्यार्थ्यास इयत्ता १०वी/११ वी,१२वी/पदवी/पदविकामध्ये किमान ५०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. एका शाखेची पदवी किंवा पदवित्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेचे पदवी किंवा पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुद्येय राहनार नाही. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी ३ टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा ४०टक्के असेल. वसतिगृहातील प्रवेश प्रक्रियेतील नियमावलीनुसार मध्यंतरीच्या वर्गात प्रवेश देता येत नाही. तथापी, विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी मध्यंतरीच्या वर्गात अर्ज केल्यास अभ्यासक्रमातील त्यापूर्वीच्या वर्षामधील पात्रता तपासुन केवळ स्वाधार योजनेचा पुढील काळाकरीता लाभ देता येईल. स्वाधार योजनेसाठी महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारित करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय राहील. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा ०२ वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खासबाब सवलत लागु राहणार नाही. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभास पात्र राहील.तथापी, शिक्षणातील खंड हा 2 वर्षापेक्षा जास्त असु नये. व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त 8 वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल. याकरीता विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे इतकी राहील. तसेच या प्रणाली मध्ये आपल्या महाविद्यालय महानगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. च्या आत असल्याबाबतचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे सदर योजनेच्या लाभाची रक्कम  ही आधार संलग्न बँक खात्यात पडणार असल्याने सर्व विध्यार्थ्यानी आधार लिंक करून KYC करून घ्यावी. व अर्ज भरत असताना आधार क्रमांक अचूक आहे याची खात्री करावी.  ज्या विद्यार्थ्यांचा नूतनीकरणाचा अर्ज आहे त्यांनी EXISTING या TAB वरून अर्ज भरावा (वस्तीगृहास अर्ज करू नये ) तसेच जे विध्यार्थी नवीन आहेत त्यांनी थेट स्वाधार ला अर्ज करावा. तसेच ज्या  विध्यार्थीनी यापूर्वी ऑनलाईन प्रणाली मार्फत वस्तीगुहासाठी अर्ज केला आहे.त्यांचे अर्ज स्वाधार साठी आपोआप वर्ग होतील त्यांना वेगळ्याने स्वाधार साठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

सूचना:-

विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे  निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील.तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले/आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील व अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. तेंव्हा पात्र विध्यार्थ्यानी http://hmas.mahait.orgया संकेतस्थळावर वरील निकषानुसार 15 जानेवारी 2025 या कालवधीत कार्यालयीन वेळेपर्यंत ऑनलाईन भरलेला  अर्ज भरल्यानंतर २ दिवसात अर्जाची 1 प्रिंट आवश्यक त्या कागदपत्रासह आपल्या भागतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाकरिता मुला/मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांच्या कडे जमा करणे बंधनकारक आहे.

00000

#mission100days

 








  वृत्त क्रमांक 46 मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांचा कार्यक्रमाला महसूल विभागाचा सक्रीय प्रतिसाद 100 दिवसांच्या मोहिमेत जिल्ह्यातील रस्ताविषयक...