वृत्त क्रमांक 45
श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा
नांदेड दि. 13 जानेवारी :- इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या आभासी जगापासून दूर राहून स्वत:वर विश्वास ठेवून यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या काक्रमासाठी पदमिनी इंटरप्रायजेसचे उद्योजक हर्षद शहा, रामनाथ तुप्तेवार, अरुणजी फाजगे, प्राध्यापक श्रीमती परमिंदरकौर महाजन, राहूल नारायण बंग, व्याख्याते सोपान कदम यांची उपस्थिती होती. दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदाची जयंतीचे औचित्य साधून श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे राष्ट्रीय युवा दिन, उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कु. प्रतिमा गोवंदे हिच्या स्वागतगीताने करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या व मनपाचे उपायुक्त रमेश चवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही उद्योगाशी निगडीत प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या संधीचा जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थीनी लाभ घ्यावा, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दिली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही औद्योगिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रसिध्द असलेली संस्था आहे. स्वामी विवेकानंदाची जयंती 12 जानेवारी रोजी आहे. स्वामी विवेकानंद हे भारताचे महान आध्यात्मिक गुरु आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जातात त्यांचे विचार आदर्श आजदेखील लाखो युवकांना मार्गदर्शक आहेत. युवकांना प्रेरीत करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, नेत्वृत्व गुण, क्षमता यासाठी त्यांचे विचार प्रेरक असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन एस.एम राका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. दासवाड, के.टी. भोसीकर, एस.एम. खानजोडे, पी.व्ही. पांचाळ, कांबळे, जी.जी. शेख, राष्री य सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एम.जी. कलबंरकर तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
00000
No comments:
Post a Comment