Thursday, June 24, 2021

 

इयत्ता 5 व 8 वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन ऑनलाईन निकाल जाहीर

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी व 8 वीच्या द्वितीय बॅचच्या मूल्यमापनाचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांनी या मुल्यमापन ऑनलाईन निकालासाठी www.msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.   

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळामार्फत इयत्ता 5 वी (प्राथमिक स्तर) व 8 वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ द्वितीय बॅचच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन 1 जानेवारी  ते 10 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. त्या मुल्यमापनाचा ऑनलाईन निकाल संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांला या माहितीची प्रत घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांनी इयत्ता 5 वी व 8 वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरीत करण्यात येईल, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.  

0000

 

नवीन रास्त भाव दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड तालुक्यासाठी 22 ठिकाणी नवीन रास्त भाव दुकानाचा परवाना मागणीसाठी अर्जाची विक्री तहसिल कार्यालयाच्या सेतु सुविधा केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. प्रत्येक अर्जाची किंमत 10 रुपये निश्चित करुन अर्जासोबत 10 रुपये शुल्क चलनाद्वारे भरुन घेण्यात येणार आहे. अर्जदार / पंचायत / स्वयंसहाय्यता गटांनी / सहकारी संस्थानी चलनाची मुळ प्रत, शपथपत्र तसेच आवश्यक ती सर्व कागदपत्रे गुरुवार 15 जुलै 2021 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय नांदेड येथे सादर करावेत, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. 

नवीन रास्त भाव दुकानाचा परवाना पंचायत (ग्राम पंचायत तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अर्जाची छाननी संबंधीत तहसिल कार्यालयात होणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी नांदेड यांनी समिती गठीत केली आहे. यामध्ये जिल्हा समन्वयक माविम, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा नांदेड तसेच संबंधीत तहसीलदार सदस्य आणि नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी तसेच महानगर पालिका क्षेत्रात संबंधित प्रभाग अधिकारी हे सहसदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

नांदेड तालुक्यात नांदेड शहरातील  ठिकाण व दुकान क्र. पुढीलप्रमाणे आहेत. नई आबादी दुकान क्रमांक 1, लेबर कॉलनी दु.क्र 6, जंगमवाडी दु.क्र. 7, गवळीपुरा दु.क्र 15, अशोकनगर दु.क्र 20, मगनपुरा दु.क्र 24,  चिखलवाडी दु.क्र 26, जूना मोंढा दु.क्र.28, गाडीपुरा दु.क्र.32, इतवारा भाजी मार्केट दु.क्र.33, इतवारा भाजी मार्केट दु.क्र. 34, ब्रम्हपुरी दु.क्र. 41, रंगार गल्ली दु.क्र. 45, गाडीपुरा दु.क्र. 47, चिखलवाडी दु.क्र. 57, चिखलवाडी दु.क्र. 58, स्नेहनगर दु.क्र. 60, चिखलवाडी दु.क्र 62, असर्जन कॅम्प दु.क्र.128, तर नांदेड ग्रामीणसाठी वाघाळा दु.क्र. 121, मौ.वाहेगाव दु.क्र.217, मौ. थुगांव, दु.क्र. 215 चा यात समावेश आहे. 

या नवीन रास्त भाव दुकानाचा परवाना जाहीर प्रगटनाद्वारे मंजूर करण्याबाबतची प्रसिध्दी 15 जून ते 15 जूलै 2021 या कालावधीत ज्या गावातील व शहरातील क्षेत्रात मंडळ अधिकारी व तलाठयामार्फत चावडी/ग्रामपंचायत, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, महानगरपालिका कार्यालयाच्या जाहीर प्रगटन व दंवडीद्वारे करावे, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

नांदेड जिल्ह्यात 20 व्यक्ती कोरोना बाधित

तर  32 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 338 अहवालापैकी  20 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर अँटिजेन तपासणीद्वारे 5 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 204 एवढी झाली असून यातील 88 हजार 527 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 186 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 11, हदगाव तालुक्यांतर्गत 1, लोहा 1, मुखेड 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, बिलोली 1 असे एकूण 20 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 32 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 1,  किनवट कोविड रुग्णालय 1,  जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, खाजगी रुग्णालय 7, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 21 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 186 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21,  मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  2, किनवट कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 3,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 76, खाजगी रुग्णालय 9 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 130 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 96 हजार 618

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 93 हजार 840

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 204

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 527

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 903

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-41

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-107

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-186

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3                       

00000

जिल्ह्यातील 95 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 95 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोविशील्डचा पहिला आणि दुसरा डोस तर कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. दिनांक 25 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 12 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको व रेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर कोविशील्डचा 18 ते 44 वयोगट आणि 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोस दिला जाईल. या केंद्रावर दोन्ही वयोगटासाठी प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

या व्यतिरिक्त कोव्हॅक्सीन ही लस श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर, सिडको, रेल्वे हॉस्पिटल या 12 केंद्रावर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्डचे ही लस 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला व दुसरा डोससाठी दिली जाईल. येथे केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी अशा एकुण 16 केंद्रावर कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध केली आहे. या प्रत्येक केंद्रांना प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहे. हे डोस 18 ते 44 व 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी दिले जातील.

 

जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणासाठी कोविशील्ड ही लस उपलध करुन देण्यात आली असून याठिकाणी 18 ते 44 व 45 वर्षावरील व्यक्तींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी राहील. या सर्व 67 केंद्रांवर प्रत्येकी 100 याप्रमाणे दोन्ही वयोगटासाठी डोस उपलब्ध करुन दिले आहे.

 

जिल्ह्यात 23 जून पर्यंत एकुण 5 लाख 33 हजार 807 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 24 जून पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 89 हजार 930 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 44 हजार 960 डोस याप्रमाणे एकुण 6 लाख 34 हजार 890 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. तसेच कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटासाठी फक्त दुसरा डोस घेण्याकरीता ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...