Saturday, May 3, 2025

नांदेड जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मिशन उडान या अभियाना अंतर्गत आज सुशिक्षित बेरोजगाराना उमेदवाराना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलिस कवायत मैदान, वजीराबाद नांदेड येथील मैदानावर करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात जवळपास ११ हजार सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी व्यक्त केली. आतापर्यंत जवळपास ३५०० उमेदवाराना नियुक्ती पत्र दिले असल्याचे त्यानी सांगितले.







 नीट (UG) प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधीत 

वस्तुंच्या वापरावर प्रशासनाचे कडक लक्ष

* ईलेक्ट्रोनिक, ब्लुटूथ वापरबंदीसाठी परीक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

नांदेड दि. 3 मे:- राष्ट्रीय परीक्षा एजेंसी नवी दिल्ली मार्फत आयोजीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात आयोजीत करण्यात आली आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकुण 56 केंद्र नियोजीत असून त्यापैकी नांदेड शहरात 46 केंद्र, मुदखेड तालुक्यात 4 केंद्र, नायगाव तालुक्यात 4 केंद्र व बिलोली तालुक्यात 2 केंद्रावर ही परीक्षा रविवार 4 मे 2025 रोजी नियोजीत आहे. नीट (UG) प्रवेश परीक्षाकरीता पात्र उमेदवारांनी रविवार 4 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यत पोहचण्याचे प्रयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले नांदेड यांनी केले आहे.  

परिक्षार्थी मार्फत कुठल्याही गैर मार्गांचा अवलंब परीक्षा काळात होऊ नये. जसे ईलेक्ट्रोनीक उपकरणांचा, ब्लुटूथचा वापर आळा बसणे अनुषंगाने परिक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत कान, नाक, घसा संबंधाने तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे. उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये पुढील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे. उमेदवाराने आणलेल्या कोणत्याही वस्तूच्या सुरक्षिततेसाठी परीक्षा केंद्र जबाबदार नसेल. मजकूर साहित्य (मुद्रित किंवा लिखित), कागदाचे तुकडे, भूमिती/पेन्सिल बॉक्स, प्लास्टिक पाउच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखनपॅड, पेनड्राइव्ह, इरेजर, कॅल्क्युलेटर, लॉगटेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तु उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नयेत.

नीट NEET (UG) प्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेसकोड संदर्भाने दिलेले निर्देशांचे तंतोतंत पालन करणे परिक्षार्थी यांना क्रमप्राप्त आहे. जसे वजनाने भारी असलेला पोषाख, फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधीत असून सांस्कृतिक व पारंपारीक पोषाखासंदर्भाने तपासणी (फ्रिसकींग) संदर्भाने, परिक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वाजेच्या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करुन घ्यावी. मोबाईल फोन, ब्लूटूथ, इअरफोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड इ. सारखे कोणतेही संप्रेषण साधन परीक्षा केंद्रावर आणण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच इतर वस्तू जसे वॉलेट, गॉगल, हँडबॅग, बेल्ट, कॅप इत्यादी कोणतेही घड्याळ, मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा इ. कोणतेही दागिने, कोणताही खाण्यायोग्य पदार्थ उघडलेला किंवा पॅक केलेला इत्यादी, तसेच कोणत्याही लपवून आणण्या जोग्या मायक्रोचिप, कॅमेरा, ब्लूटूथ उपकरण इत्यादी संप्रेषण साधने, इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकतात, त्या सर्व प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही उमेदवाराकडे, परीक्षा केंद्रात नमुद प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल आणि कायद्यान्वये संबंधित तरतुदींनुसार उमेदवारावर कारवाई केली जाईल, याची सर्व परिक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

०००००

वृत्त क्रमांक 467

नीट परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड दि. 3 मे :- "नीट परीक्षा 2025" ही रविवार 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 56 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.  या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता  2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.  

परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 4 मे 2025 रोजी  दुपारी 12  वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतच्या सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी,  भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

00000

 राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्हज २०२५ निमित्त आयोजित 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियाचे आयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.

भारताला प्रो रेसलिंगसाठी स्वतःचे व्यासपीठ 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया'मुळे उपलब्ध झाले आहे. भारतासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जगाला दिलेले ठोस उत्तर आहे की भारत सर्वकाही करू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.






 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वेव्ह्स 2025'च्या भारतीय ग्रामीण पारंपारिक कला व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती.

#WAVES2025 #WAVES #WAVESIndia







‘वेव्हज’ला भेट देणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया...


 

 स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक असल्याचे मत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर व कंटेंट क्रिएटर डॉली सिंग यांनी व्यक्त केले.


बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत "Connecting Creators, Connecting Countries" या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी देश-विदेशातील नामवंत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि लोकप्रिय कंटेंट क्रिएटर सहभागी झाले होते.

#WAVES2025
#WAVES
#WAVESIndia
#WAVESummit
#WAVESummitIndia
#CreateInIndiaChallenge 
See less



 डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा राहिलेला नाही. विश्वासार्हता, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी माध्यम संस्थांना आता नव्या रणनीतीची गरज असल्याचे मत वरिष्ठ पत्रकार आणि संपादकांनी चर्चासत्रात व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये ‘इवोल्युशन ऑफ डिजिटल न्यूज : स्टेइंग रिलीव्हेंट इन द एज ऑफ इन्फॉर्मेशन ओवरलोड’ या विषयावर पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली. यावेळी बिझनेस टुडेचे संपादक सिद्धार्थ झराबी यांच्या सूत्रसंचालनाखाली या चर्चेत मनीकंट्रोलचे कार्यकारी संपादक नलिन मेहता, द इंडियन एक्सप्रेस डिजिटलचे सीईओ संजय सिंधवानी, आरटी इंडियाचे कार्यकारी संपादक अशोक बजरिया यांनी सहभाग घेतला.

 भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ असल्याचे जागतिक व्यवसायातील अग्रणी आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार शॉ यांनी सांगितले.

‘भारताचे नवोन्मेष पुनरुत्थान : जागतिक स्तरावरील पहिल्या स्टार्टअप्सचे पुढील दशक’ या विषयावर फोर्ब्सच्या एडिटर ॲट लार्ज मनीत आहुजा यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला.
सृजनशील आशय निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी चित्रपटांच्या पलीकडे विचार करत जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे ब्रँड्स, परिसंस्था आणि बौद्धिक संपदा निर्माण केली पाहिजे, असे किरण मझुमदार शॉ यांनी सांगितले.

  दि. 16 मे 2025 वृत्त   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर दिड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन ‘सीट्रिपलआयटी’ना मंजूरी...