Saturday, May 3, 2025

 समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कम्युनिटी रेडिओ हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला व्यासपीठ देण्याचे काम देशातील कम्युनिटी रेडिओ यांनी करावे, असे आवाहन माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केले.

मुंबईत सुरू असलेल्या 'वेव्हज २०२५' या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आठव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मुरुगन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव पृथुल कुमार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशनच्या कुलगुरु डॉ. अनुपमा भटनागर आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कम्युनिटी रेडिओ यांना इनोव्हेटिव्ह कम्युनिकेशन, प्रमोटिंग लोकल कल्चर, सस्टेनेबिलिटी मॉडेल अवॉर्ड्स यासारखे विविध पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  690 कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड  सुधारित  दौरा     नांदेड दि.   2 जुलै ...