केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एव्हीजीसी -एक्सआर शिक्षण आणि नवोन्मेषात क्रांती घडवून आणण्यासाठी आयआयसीटीच्या जागतिक कंपन्यांसोबतच्या सहकार्याला हिरवा झेंडा दाखवला.
आयआयसीटीच्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
या प्रसंगी उपस्थित केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले की, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.
No comments:
Post a Comment