Thursday, September 19, 2019


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मराठवाडा मुक्ती संग्राम, विद्यापीठ वर्धापण दिन साजरा
नांदेड, दि. 19 :- शासकीय अध्यापक महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन नुकताचा साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीत व विद्यापीठ ध्वज फडकावून विद्यापीठ गीत घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. रोडगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास मांडला तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. शाकेर, डॉ. शेख, डॉ. मुरुमकर, प्रा. राऊत, डॉ. राठोड, मु. लि. गच्चे, व. लि. जाधव, सर्वश्री हंबर्डे, सोनाळे, श्रीमती जाधव, श्रीमती राठोड, श्री. केंद्रे, श्रीमती होळकर आदी कर्मचारी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारोती अक्कलवाड यांनी केले. कार्यक्रमाला बी. एड. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
00000



नवरात्र उत्सवात पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 19 :- जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत नवरात्र उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर दुर्गादेवी, शारदादेवीची स्थापना व विसर्जन करण्यात येते. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2019 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिर सभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.
00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...