Thursday, September 19, 2019


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मराठवाडा मुक्ती संग्राम, विद्यापीठ वर्धापण दिन साजरा
नांदेड, दि. 19 :- शासकीय अध्यापक महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व विद्यापीठ वर्धापन दिन नुकताचा साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रगीत व विद्यापीठ ध्वज फडकावून विद्यापीठ गीत घेण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. रोडगे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास मांडला तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला डॉ. शाकेर, डॉ. शेख, डॉ. मुरुमकर, प्रा. राऊत, डॉ. राठोड, मु. लि. गच्चे, व. लि. जाधव, सर्वश्री हंबर्डे, सोनाळे, श्रीमती जाधव, श्रीमती राठोड, श्री. केंद्रे, श्रीमती होळकर आदी कर्मचारी उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारोती अक्कलवाड यांनी केले. कार्यक्रमाला बी. एड. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
00000


No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...