बटालियन
जलद कृती दल 99, (केंद्रीय राखीव पोलीस) यांचे जिल्हास्तरीय कवायत
नांदेड, दि. 18:- 99 बटालियन जलद कृती दल, (केंद्रिय राखिव पोलीस दल) हकीमपेठ, सिकंद्राबाद ( तेलंगाना
राज्य) यांची
एक तुकडी दिनांक 13 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2018 या एक आठवड्याच्या कालावधी दरम्यान
नांदेड जिल्ह्याच्या (परिचय आणि माहीती सराव) फॅमिलियराईझेशन एक्सरसाइजसाठी नांदेड जिल्ह्याच्या
भेटीवर आहे.
केंद्रिय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार
नांदेड जिल्हयात दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2018 या एक आठवडयाच्या कालावधी
दरम्यान उक्त तुकडी नांदेड शहर आणि जिल्हयातील संवेदनशिल ठिकाणांना आणि
या क्षेत्रांच्या भौगालिक मांडणीला भेट देतील तथा त्या ठिकाणांची भौगोलिक माहीती
प्रत्यक्ष भेट देवुन उपलब्ध करुन घेतील. अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था भंग पडल्यास
अश्या असंतोषाच्या वेळी प्रशासनाला जर जलद कृती दल (केंद्रिय राखिव पोलीस दल) यांच्या आणीबाणी
तैनातीसाठी आवश्यकता भासल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रमाणित कृती
आराखडयांनुसार याची पध्दत विषद करतील.
सदर पथकाचे नेतृत्व सहायक
कमांडेट संतोष कुमार, डि.वाय.एस.पी. 99 बटालियन जलद कृती दल, (केंद्रिय राखिव पोलीस) हकीमपेठ, सिकंद्राबाद ( तेलंगाना
राज्य) हे
करीत असुन या एक प्लाटुनमध्ये पुरुष आणि महीला कर्मचारी तथा अधिकारी असे 60 सदस्य
आहेत. या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी
उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर आणि नांदेडचे उपविभागीय अधिकारी
प्रदिप कुलकर्णी यांना सदिच्छा भेट देवून त्यांच्याव्दारे करण्यात येत असलेल्या
कवायतीसंबंधी विस्तृत प्रबंधनाची माहीती दिली. असे जिल्हा प्रशासनाच्या जिल्हाधिकारी
केंद्रीय नियंत्रण कक्षाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
0000