Tuesday, December 18, 2018


नॅशनल वॉटर अवॉर्ड 2018 साठी
                                                 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 18:-   जलसंसाधन, नदी विकास गंगा संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली मार्फत नॅशनल वॉटर अवॉर्ड 2018 देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सदर पुरस्कारामध्ये उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपालिका/पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, दुरचित्रवाहीनी वरील कार्यक्रम, वर्तमानपत्र (इंग्रजी) प्रस्ताव असे एकूण वेगवेगळ्या 13 घटकांसाठी हे वेगवेगळे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वसाधारणपणे प्रशस्तीपत्र प्रथम पुरस्कार रक्कम रु. 2.00 लाख, व्दीतीय पुरस्कार रक्कम रु. 1.50 लाख तृतीय पुरस्कार रक्कम रु. 1.00 लाख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करणेची अंतिम मुदत दि. 31 डिसेंबर, 2018 आहे. सदर पुरस्काराबाबत अधिक माहीती cgwb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार विहित नमुन्यात प्रस्ताव जलसंसाधन, नदी विकास गंगा संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांना सादर करावेत.

0000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...