Tuesday, December 18, 2018


अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस साजरा
 
नांदेड, दि. 18:- दि. 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस म्‍हणून जगभरात साजरा केला जातो. याअनुषंगाने आज जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली बचत भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस साजरा करण्‍यात आला.
            या कार्यक्रमासाठी जिल्‍हा सत्र न्‍यायालय, नांदेड अॅड.श्री विजय गोणारकर, मुव्‍हमेंट फॅार पिस अॅड जस्‍टीस  जिल्‍हाध्‍यक्ष फेराज खान गाझी हे व्‍याख्‍याते म्‍हणून लाभले.
            कार्यक्रमाच्‍या सुरवातीस श्री.अनीस शेख, सदस्‍य, जिल्‍हा अल्‍पसंख्‍यांक कल्‍याण समिती, नांदेड यांचे स्‍वागत जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने उपजिल्‍हधिकारी तथा अल्‍पसंख्‍यांक विकास अधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी केले. तसेच व्‍यख्‍यातांचे स्‍वागत जिल्‍हा नियोजन अधिकारी  एस.बी.कोलगणे यांनी केले.
      अल्‍पसंख्‍यांकरिता जिल्‍हास्‍तरावर संबंधित विभागांकडून राबविण्‍यात येणा-या विविध योजनांची माहिती जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनी पी.पी.टीच्‍या माध्‍यमातून उपस्थितांना दिली.
            व्‍याख्‍याता म्‍हणून बोलताना अॅड.गोणारकर यांनी अल्‍पसंख्‍याच्‍या शैक्षणिक सा?माजिक सुरक्षेच्‍या हक्‍काबाबत  संविधानात नमूद असलेल्‍या कलमांची माहिती देवून अल्‍पसंख्‍यांच्‍या प्रगतीशिवाय देशाच्या प्रगतीचे मोजमाप करणे अशक्‍य असल्‍याचे नमूद करून अल्‍पसंख्‍याक समुदायातील लोकांकरिता असलेल्‍या संविधानातील बाबी सामान्‍य माणसापर्यंत पोहचविण्‍याचे आवाहन केले.
            प्रमूख वक्‍ते म्‍हणून लाभलेले श्री.फेरोज खान काझी यांनी अल्‍पसंख्‍यांकांना समाजाच्‍या मूख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी त्‍यांना आवश्‍यक ते शिक्षण देवून रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करून देण्‍यासंदर्भात मत व्‍यक्‍त केले. तसेच अल्‍पसंख्‍याक समाजातील महिलाकरिता विशेष योजना शासनस्‍तरावर राबविल्‍यास त्‍याचा फायदा महिलांच्‍या जीवनामानाचा दर्जा उंचाविण्‍यासाठी होईल असे नमूद करून अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍यांकरिता शासनामार्फत देण्‍यात येणा-या शिष्‍यवृत्‍यांचा समाजातील विद्यार्थ्‍यांना उपयोग होत असल्‍याचे सांगितले. तसेच जिल्‍हास्‍तरावर अल्‍पसंख्‍यांकाकरिता राबविण्‍यात येणा-या योजनांसाठी शासनस्‍तरावरून एक अधिकारी नियुक्‍त करण्‍याची गरज असल्‍याचे बोलले.
            जिल्‍हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुरेश थोरात  बोलतांना म्‍हणाले की, जो पर्यंत तळागाळातील वंचित समुदाय स्‍वतः शासकीय योजनांच्‍या संदर्भात जागरूक राहणार नाही तो पर्यंत त्‍या समुदायाचा विकास होणार नाही. यावेळी उपस्थित एम.पी.जे या सामाजिक संस्‍थेनी सुध्‍दा शासनाच्‍या सर्व योजनांसंदर्भात अल्‍पसंख्‍यांक समुदायास त्‍यांचे मार्फत जनजागृती करण्‍याचे अवाहन केले.
            या कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी, अल्‍पसंख्‍यांक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या शेवटी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने सहा.जिल्‍हा नियोजन अधिकारी, मानव विकास जी.बी.सुपेकर यांनी उपस्थितांचे आभार माणून कार्यक्रम संपल्‍याचे जाहीर केले.
 
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...