Tuesday, May 16, 2017

पालकमंत्री अर्जून खोतकर यांचा दौरा
नांदेड, दि. 16 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर हे बुधवार 17 मे 2017 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
बुधवार 17 मे 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.10 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 8.25 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने मुखेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. मुखेड येथे आगमन व आमदार सुभाष साबणे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सकाळी 11.30 वा. मुखेड येथून मोटारीने चिखलीकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. चिखली येथे आगमन व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट. सोईनुसार चिखली येथुन शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील.

000000
सेवार्थ व निवृत्तीवेतन वाहिनी, अर्थ वाहिनी,
कोष वाहिनी नियमीतपणे चालू
नांदेड, दि. 16 :- सेवार्थ व निवृत्तीवेतन वाहिनी, अर्थ वाहिनी, कोष वाहिनी रविवार 14 मे 2017 पासून नियमीतपणे चालू झाली आहे. जिल्ह्यातील अहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी वाहिनी चालू झाल्याची नोंद घेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
कापूस राशी 359 वाणावर बंदी ;
 शेतकऱ्यांनी खरेदी करु नये कृषि विभागाचे आवाहन
नांदेड, दि. 16 :- ज्या शेतकऱ्यांनी कापसाची राशी 659 या बियाण्याची पॅकीटे खरेदी केली आहे त्यांनी त्वरीत खरेदी केलेल्या विक्री केंद्रात परत करावीत. त्याऐवजी दुसऱ्या वाणाच बियाणे खरेदी करावेत किंवा बियाण्याची रक्कम परत घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी  राशी 659 या वाणाची लागवड करणार आहे त्यांना भविष्यात या कापसावर सेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास स्वत: शेतकरी जबाबदार राहतील, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, बिलोली, धर्माबाद यासह अन्य भागात कापसाचे पिक मोठया प्रमाणावर घेतले जाते. नगदी म्हणून शेतकरी कापसाला प्राधान्य देतात. कापूस उत्पादक कापसाची राशी 659 या बियाण्याला पसंती देतात. मात्र हे वाणच (बोंडअळी) अळीला बळी पडत असल्याने कृषि आयुक्तालयाने राज्यात या वाणावरच बंदी घातली आहे. विभागीय,  जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाने ही विक्री बंद केल आहे.
जिल्हयात सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. यात कपाशीची राशी 659 या बियाण्याला ठराव तालुक्यातून मोठी मागणी आहे. मात्र हेच वाण गुलाबी (बोंडअळी) अळीला बळी पडत असल्याने कृषि आयुक्तालयाने बंदी घातली आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागाने विक्री बंदची कार्यवाही सुरु केली. जिल्हयात राशी 659 या वाणाची 1 लाख 1 हजार 280  पॉकिटे आहेत. त्याची किंमत 8 कोटी 10 लाख रुपये आहे. यावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि कार्यालयाने दिली आहे.

000000
खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधी खरेदी
करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी - कृषि विभाग
नांदेड, दि. 16 :- खरीप हंगाम- 2017 मध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी खरेदी करताना शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
गुणवत्ता दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य दयावे. बनावटभेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर शेतकऱ्याची विक्रेत्याची स्वाक्षरी मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती संभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन / पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची किटे सिलबंद, मोहोर बंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी किटावरची अंतीम मुदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल, एस.एम.एस. इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनाकरीता कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा. गुरुवार 1 जून 2017 पासून डीबीटीद्वारे रासायनिक खताची विक्री करण्यात येणार आहे. खत खरेदी करताना आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड नंबर देऊनच खताची खरेदी करावी, असेही आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...