Tuesday, May 16, 2017

कापूस राशी 359 वाणावर बंदी ;
 शेतकऱ्यांनी खरेदी करु नये कृषि विभागाचे आवाहन
नांदेड, दि. 16 :- ज्या शेतकऱ्यांनी कापसाची राशी 659 या बियाण्याची पॅकीटे खरेदी केली आहे त्यांनी त्वरीत खरेदी केलेल्या विक्री केंद्रात परत करावीत. त्याऐवजी दुसऱ्या वाणाच बियाणे खरेदी करावेत किंवा बियाण्याची रक्कम परत घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी  राशी 659 या वाणाची लागवड करणार आहे त्यांना भविष्यात या कापसावर सेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास स्वत: शेतकरी जबाबदार राहतील, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, बिलोली, धर्माबाद यासह अन्य भागात कापसाचे पिक मोठया प्रमाणावर घेतले जाते. नगदी म्हणून शेतकरी कापसाला प्राधान्य देतात. कापूस उत्पादक कापसाची राशी 659 या बियाण्याला पसंती देतात. मात्र हे वाणच (बोंडअळी) अळीला बळी पडत असल्याने कृषि आयुक्तालयाने राज्यात या वाणावरच बंदी घातली आहे. विभागीय,  जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाने ही विक्री बंद केल आहे.
जिल्हयात सोयाबीन पाठोपाठ कपाशीचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. यात कपाशीची राशी 659 या बियाण्याला ठराव तालुक्यातून मोठी मागणी आहे. मात्र हेच वाण गुलाबी (बोंडअळी) अळीला बळी पडत असल्याने कृषि आयुक्तालयाने बंदी घातली आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागाने विक्री बंदची कार्यवाही सुरु केली. जिल्हयात राशी 659 या वाणाची 1 लाख 1 हजार 280  पॉकिटे आहेत. त्याची किंमत 8 कोटी 10 लाख रुपये आहे. यावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषि कार्यालयाने दिली आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...