Tuesday, May 16, 2017

खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधी खरेदी
करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी - कृषि विभाग
नांदेड, दि. 16 :- खरीप हंगाम- 2017 मध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी खरेदी करताना शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.
गुणवत्ता दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य दयावे. बनावटभेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर शेतकऱ्याची विक्रेत्याची स्वाक्षरी मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती संभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन / पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची किटे सिलबंद, मोहोर बंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी किटावरची अंतीम मुदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल, एस.एम.एस. इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनाकरीता कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा. गुरुवार 1 जून 2017 पासून डीबीटीद्वारे रासायनिक खताची विक्री करण्यात येणार आहे. खत खरेदी करताना आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड नंबर देऊनच खताची खरेदी करावी, असेही आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...