Thursday, January 27, 2022

 नांदेड जिल्ह्यात 457 व्यक्ती कोरोना बाधित

तर 498 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 392 अहवालापैकी 457 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 498 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 501 एवढी झाली असून यातील 93 हजार 672 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला हजार 164 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हिमायतनगर काझ्झी गल्ली येथील 78 वर्षाच्या एका पुरुषाचा बुधवार 26 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 66एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 231धर्माबाद 1, लोहा 1, बिलोली 3, लातूर 2, आदिलाबाद 3, वाशीम 3, हरियाणा 3, नांदेड ग्रामीण 44, कंधार 4, मुदखेड 1, अर्धापूर 5, परभणी 2, हैद्राबाद 2, उत्तरप्रदेश 1, औरंगाबाद 1, भोकर 1, हदगाव 4, मुखेड 2, उमरी 22, हिंगोली 9, तेलंगणा 2, बिहार 2, देगलूर 36, किनवट 18, हिमायतनगर 1, नायगाव 2, अकोला 2, पुणे 2, पंजाब 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 9मुदखेड 2, भोकर 6, नायगाव 9, देगलूर 9, किनवट 4 असे एकुण 457 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 377, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 105, खाजगी रुग्णालय असे एकुण 498 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 176किनवट कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 908खाजगी रुग्णालय 39, असे एकुण हजार 164  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 38 हजार 427

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 22 हजार 815

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 501

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 93 हजार 372

एकुण मृत्यू संख्या-हजार 665

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.20 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-5

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-हजार 164

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...