Tuesday, April 23, 2019


जागतिक ग्रंथ दिनानिमित्त
ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
नांदेड दि. 23 :- जागतिक ग्रंथ दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आज करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक जगदीश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी जागतिक ग्रंथ दिन हा  23 एप्रिला का साजरा करण्यात येतो, वाचनाचे व ग्रंथाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले. निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रताप सुर्यवंशी, संजय पाटील, संजय कर्वे,  कोंडीबा गाडेवाड,  ग्रंथालय कार्यकर्ते, विद्यार्थी व वाचकवर्ग उपस्थित होते. उत्साहात नांदेड येथे जागतिक ग्रंथ दिन साजरा करण्यात आला. 
00000


स्ट्रॉग रुम परिसरात 144 कलम लागू 
नांदेड, दि. 23 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड लोकसभा मतदानाची प्रक्रिया गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी पार पाडली आहे. या मतदानाशी संबंधीत मतदान यंत्रे व अभिलेखे नांदेड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारत येथील स्ट्रॉग रुममध्ये शिलबंद करुन सुरुक्षेच्यादृष्टिने संबंधीत सुरक्षा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. 
या स्ट्रॉग रुम परिसरात बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशामुळे काही अनूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारती पासून 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत. याठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस 19 एप्रिल 2019 ते 23 मे 2019 रोजी सकाळी 6 या कालावधीत प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000



जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात 7 मे 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 23 एप्रिल ते 7 मे 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


वाळू उपसा करणारे दोन बोट स्फोटकाद्वारे नष्ट
नांदेड दि. 23 :- मुदखेड तालुक्यातील मौजे वासरी येथील गट नंबर 418 लगत गोदावरी नदीमध्ये दोन सक्शन पंप बोर्ड वारे वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील उपस्थित असलेल्या नागरिकांना कोणाची बोट आहे याबाबत विचारणा केली तेंव्हा माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांचे मार्गदर्शनाखाली दोन्ही सक्शन पंप बोट जिलेटिन स्फोटकाद्वारे नष्ट करण्यात आल्या. या कार्यवाहीत मुखेडचे तहसीलदार दिनेश दामले, नायब तहसीलदार  संजय सोलंकर, श्री भोसीकर, पोलीस निरीक्षक श्री. मांजरे, सपोनि नितीन खंडागळे, मंडळाधिकारी बी. डी. कुराडे, अनिल धुळगुंडे, तलाठी दत्ता कटारे, प्रवीण होडे, संदीप केंद्रे आणि कोतवाल श्रीधर पाटील सुलतान पठाण, राजू गुंतले सहभागी होते.   
00000


राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 23 :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे. अशा आशयाचे शासन परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.  
दरवर्षी 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...