Tuesday, April 23, 2019


स्ट्रॉग रुम परिसरात 144 कलम लागू 
नांदेड, दि. 23 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारतीच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड लोकसभा मतदानाची प्रक्रिया गुरुवार 18 एप्रिल 2019 रोजी पार पाडली आहे. या मतदानाशी संबंधीत मतदान यंत्रे व अभिलेखे नांदेड शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारत येथील स्ट्रॉग रुममध्ये शिलबंद करुन सुरुक्षेच्यादृष्टिने संबंधीत सुरक्षा विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. 
या स्ट्रॉग रुम परिसरात बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशामुळे काही अनूचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नांदेडच्या बाबानगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील माहिती व तंत्रज्ञान इमारती पासून 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकून घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत. याठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस 19 एप्रिल 2019 ते 23 मे 2019 रोजी सकाळी 6 या कालावधीत प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...