Saturday, February 1, 2025
वृत्त क्र. 137
८ फेब्रुवारीला शासकीय सेवा व योजनांचे किनवट येथे महाशिबीर
नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड,
किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक
नांदेड दि. १ फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजीत करण्यात आले आहे.
समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 08 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11ः00 वाजता या महाशिबिराचे उदघाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा ,असे आवाहन मा. सुरेखा कोसमकर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड, अभिजीत राउत, जिल्हाधिकारी, नांदेड, श्रीमती दलजीत कौर जज, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांनी केले आहे.
0000
दि. १ फेब्रुवारी 2025
वृत्त क्र. 136
वृत्त क्रमांक 370 गीग व प्लॅटफॉर्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन नांदेड, दि. 11 एप्रिल :- केंद्रीय श्रम व रोजगार मं...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...