Wednesday, April 1, 2020

108 व नांदेड शहरातील रुग्‍णवाहिची माहिती.


मद्य विक्रीचे दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद
नांदेड दि. 1 :- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (सीएल-3), विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-2, एफएल-3 व एफएल-4), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-2), पॉपी-2 अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ ताडी विक्री केंद्र (टिडी-1) अनुज्ञप्ती 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा कालावधीत वाढवून मंगळवार 14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा 1949 चे कलम 54 व 56 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
00000

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
वृत्तपत्र छपाई, विक्री करणाऱ्या एजंट, विक्रेता,
माध्यमांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत आदेश  
नांदेड, दि. 1 :- जिल्ह्यात वृत्तपत्र छपाई, विक्री करणारे एजंट, विक्रेता, इलेक्ट्रॉनिक मिडिया या माध्यमांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध करावयाच्या आवश्यक उपाय योजना / निर्देशाबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीया व माध्यमांनी कोव्हीड -9 प्रतिबंध होण्याकामी पुढील प्रमाणे उपाययोजना करण्याबाबत आदेशीत केले आहे.
वृत्तपत्रांचे वितरण करणारे एजंट, छपाई, विक्रेते व वाटप करणारे लाईने बॉय यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून वितरीत करण्यात आलेले विहित नमूद ओळखपत्र बाळगावेत तसेच वृत्तपत्र वितरण सकाळी 5 ते सकाळी 8 या कालावधीत करावे. स्टॉल लाऊन वृत्तपत्र विक्रीस प्रतिबंध राहील. वृत्तपत्र छपाई व वितरणांच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याबाबत सर्वांना सुचना दयाव्यात. कार्यालयामध्ये स्वच्छता ठेवावी व निर्जतुकीकरणाची फवारणी करावी. दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्यात यावे. वृत्तपत्र वितरण कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करुन दयावेत.
सदर आदेश पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील तसेच यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश व परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...