Monday, June 26, 2017

जिल्ह्यात सरासरी 13.41 मि.मी. पाऊस
          नांदेड, दि. 27 - जिल्ह्यात मंगळवार 27 जुन 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.41 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 214.55  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 148.78 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 15.57 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 27 जुन रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 18.00 (216.40), मुदखेड- 17.00 (181.66), अर्धापूर- 24.67 (153.33) , भोकर- 15.50  (166.00) , उमरी- 10.67 (96.00), कंधार- 10.00 (166.34), लोहा- 9.67 (149.67), किनवट- 25.43 (176.43), माहूर- 1.50 (133.88), हदगाव- 6.71 (177.76), हिमायतनगर- 7.00 (100.48), देगलूर- 11.83  (111.16), बिलोली- 21.00 (141.80), धर्माबाद- 14.00 (145.34), नायगाव- 13.00 (126.26), मुखेड- 8.57 (138.00) आज  अखेर  पावसाची सरासरी 148.78 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2380.51) मिलीमीटर आहे.

00000 
 राजर्षी शाहुंना जयंती निमित्त अभिवादन
समता दिंडीत उत्स्फुर्त सहभाग
नांदेड दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने "समता दिंडी"चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. डोंगरे व मनपा आयुक्त श्री. देशमुख यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवुन मार्गस्थ करण्यात आले.      
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, विविध शाळेचे असंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा फुले चौक परिसरापासून, शिवाजीनगर, कलामंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरुन दिंडी काढण्यात आली. समता दिंडीत विविध घटकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला व प्रतिसाद दिला. समता दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  

यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी ए. बी. कुंभारगावे, शिक्षणाधिकारी जयश्री गोरे, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापु दासरी, गटशिक्षणाधिकारी अशोक देवकरे, समता दुतचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. 
000000
महान व्यक्तींच्या आचार-विचारांचे  
अनुकरण केले पाहिजे - अप्पर जिल्हाधिकारी पाटील
नांदेड दि. 26 :- छत्रपती शाहू महाराजांचे कार्य त्यांच्या राजर्षी पदवीला न्याय देणारे असून त्यांच्या जयंती निमित्त प्रत्येकांनी महान व्यक्तींच्या आचार-विचारांचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, नायब तहसिलदार एन. बी. बोलोलु यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी स्वत:च्या कृतीतून समाजातील शेवटच्या व्यक्तीला चांगला संदेश देण्याचे कार्य केले आहे. योग्य न्याय करण्याची भुमिकाही त्यांची होती. कृषि विकासासाठी अशिया खंडातील सर्वात मोठे राधानगरी धरण त्यांनी उभारले आहे. स्वत:च्या कार्यकाळत त्यांनी विविध क्षेत्रात भरीव कार्य केले असून त्यांना रयतेचा राजा म्हणून ओळखले जाते, असेही त्यांनी सांगितले.  
जिल्हाधिकारी कार्यालयातील सौ. स्वाती आलोले यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातून समाजाला चांगली दिशा देण्याचे कार्य होऊ शकते, असे सांगितले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी केले तर आभार उपजिल्हाधिकारी (सामान्य)  सौ. ढालकरी यांनी मानले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

00000
जिल्ह्यात आतापर्यंत 14.17 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 26 - जिल्ह्यात सोमवार 26 जुन 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 2.00 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 31.95  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 135.37 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14.17 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 26 जुन रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- निरंक (198.40), मुदखेड- 1.33 (164.66), अर्धापूर- निरंक (128.66) , भोकर- 2.50  (150.50) , उमरी- 0.33 (85.33), कंधार- 0.33 (156.34), लोहा- निरंक (140.00), किनवट- निरंक (151.00), माहूर- निरंक (132.38), हदगाव- 1.00 (171.05), हिमायतनगर- निरंक (93.48), देगलूर- 2.83  (99.33), बिलोली- 6.20 (120.80), धर्माबाद- 8.00 (131.34), नायगाव- निरंक (113.26), मुखेड- 9.43 (129.43) आज  अखेर  पावसाची सरासरी 135.37 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2165.96) मिलीमीटर आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...