Monday, June 26, 2017

 राजर्षी शाहुंना जयंती निमित्त अभिवादन
समता दिंडीत उत्स्फुर्त सहभाग
नांदेड दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 143 व्या जयंती निमित्त सामाजिक न्याय दिनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने "समता दिंडी"चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. डोंगरे व मनपा आयुक्त श्री. देशमुख यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवुन मार्गस्थ करण्यात आले.      
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर प्रकाश टाकणारा चित्ररथ आणि सामाजिक न्याय बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या घोषणांमुळे दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, विविध शाळेचे असंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. महात्मा फुले चौक परिसरापासून, शिवाजीनगर, कलामंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरुन दिंडी काढण्यात आली. समता दिंडीत विविध घटकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला व प्रतिसाद दिला. समता दिंडीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आला.  

यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी ए. बी. कुंभारगावे, शिक्षणाधिकारी जयश्री गोरे, वरीष्ठ समाज कल्याण निरीक्षक बापु दासरी, गटशिक्षणाधिकारी अशोक देवकरे, समता दुतचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. 
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...