पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड (जिमाका) दि. 16 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल.
गुरुवार 16
सप्टेंबर 20201 रोजी उमरखेड येथून नांदेड येथे रात्री 10
वाजता आगमन व राखीव. शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.25 वा. शिवाजीनगर निवासस्थान येथून मोटारीने माता गुजरीजी विसावा उद्यान
नांदेड कडे प्रयाण. सकाळी 8.30 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 व्या
वर्धापन दिनोत्सावानिमित्त हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र
अर्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73
व्या वर्धापन दिनोत्सावानिमित्त राष्ट्रध्वज वंदन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सकाळी
9.25 वाजता मराठवाडा गौरव गीताच्या ध्वनीचित्रफितीचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास
उपस्थिती. (प्रसिध्द कवी मा. लक्ष्मीकांत तांबोळी) महिला व बालकल्याण विभाग, म.न.पा.नांदेड स्थळ- माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड. सकाळी 9.40
वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माता गुजरीजी विसावा उद्यान येथे
आयसोलेटेड एम.बी.बी.आर टेक्नालॉजीने बांधण्यात आलेल्या मल शुध्दीकरण केंद्राचे
लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ माता गुजरीजी
विसावा उद्यान नांदेड. सकाळी 10 वाजता महात्मा फुले मार्केट (शॉपिंग सेंटर) पुर्नविकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ महात्मा फुले मार्केट (गणेशनगर रोड) शिवाजी नगर
नांदेड. दुपारी 4.30 वाजता येळेगाव, ता.अर्धापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास
उपस्थिती स्थळ येळेगाव ता. अर्धापूर. सायंकाळी 6 वाजता नांदेड येथील नवनिर्मित
दक्षता संकल्पचित्र विभाग (पुल व इमारती) कार्यालयाच्या
उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- स्नेहनगर नांदेड. सायंकाळी 6.30 वाजता नांदेड
येथील नवनिर्मित दक्षता व गुण नियंत्रण विभाग कार्यालय व क्षेत्रिय प्रयोगशाळेच्या
उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- स्नेहनगर नांदेड. सोईनुसार नांदेड निवासस्थान
येथे आगमन व राखीव.
00000