Monday, July 15, 2024

#नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गावागावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सध्या कॅम्प सुरू झाले असून कॅम्प मधील महिलांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया व अर्ज भरण्याची प्रक्रिया. #majhiladkibahinyojana



महाराष्ट्र शासनाच्या #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण या महत्त्वाकांक्षी योजनेची सर्वंकष माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या...

आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण...



 #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजनेचे अर्ज महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल, मोबाईल ॲपव्दारे, सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरता येणार आहेत. #majhiladkibahinyojana




#नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहिण योजनेसाठी गावागावांमध्ये शिबीर आयोजित करण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नांदेड शहरात ही मोहिम वार्डावार्डामध्ये राबवण्यात येणार आहे.३१ ऑगस्ट अर्जाची शेवटची तारीख आहे. #majhiladkibahinyojana



  वृत्त क्र. 595

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालक संवाद घडवावा

-शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे

नांदेड दि. 15 जुलै : जिल्ह्यातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन शिक्षक पालक संवाद घडवावा, असे मत लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्हयातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

विष्णूपूरी येथील ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस येथे नुकतेच शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड व ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस विष्णूपूरी नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सहविचार सभेतून नांदेड जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना ते मार्गदर्शन करत होते.

शाळेतून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व क्लासेसकडे वळलेला विद्यार्थ्यांचा ओढा शाळांकडे पुन्हा वळविण्यासाठी शिक्षकांनी शाळातून प्रात्यक्षिक करवून घेत शिक्षणात रस निर्माण करावा असे ते यावेळी म्हणाले. अध्यापनात रूची निर्माण करण्यासाठी नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर वर्गातून करावा. प्रसंगी शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी लातूरचे सहायक शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांनी कॉपीमुक्तीचा नांदेड पॅटर्न कायम ठेवण्यासाठी उपस्थितांना प्रोत्साहित केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांस शिकवणी वर्गास जाण्याची वेळ का येते यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज विषद केली. अनेक शाळांतील प्रयोगशाळा या देखाव्याची वास्तू बनल्या असून त्या पुनरूज्जवीत करण्याची आवश्यकता त्यांनी पटवून सांगितली.

यावेळी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये अंतर्गत गुणांच्या जोरावर पास होणे अगदी सोपे बनले असून देखील विद्यार्थी अगदी 5 ते 10 गुण मिळवू शकत नसतील तर कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असतील तर यास कुठेतरी शिक्षकच जबाबदार नाही का यासाठी आत्म्परीक्षण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या शाळेतील गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी अध्यापनात रूची निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपतून माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी उपस्थितांना प्रवेश प्रक्रियेतील नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची आवाहन करीत आभार व्यक्त केले. यावेळी मंचावर उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णकुमार फटाले, सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनूमंत पोकले, कार्यालयीन अधिक्षक शंकर पूपूलवाड, जुक्टा संघटनेचे विभागीय मार्गदर्शक मुकूंद बोकारे, जिल्हा सचिव नारायण गाडवे व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय पवार आदिंची उपस्थिती होती. सूत्रसंचलन डॉ ओमप्रकाश दरक यांनी केले.

0000

 वृत्त क्र. 594 

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना

 

नांदेड दि. 15 जुलै : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनिंनी सन 2024-25 या वर्षासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना चे परीपूर्ण प्रस्ताव संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेड यांच्याकडे गुरूवार 25 जुलै 2024 रोजी पर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

इतर मागास बहुजन कल्याण या विभागांतर्गत राज्यातील मान्यता प्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय/तंत्रनिकेतनामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या योजनेच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदरील योजना ही व्यावसायिक/बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपाययोजनेबाबत जिल्ह्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांकडून सन 2024-25 या वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

000000

वृत्त क्र. 593

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी

कागदपत्रे जमवण्यासाठी मध्यस्थांच्या भूलथापांना

बळी न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

·   नांदेड जिल्ह्यात एका जणावर गुन्हा दाखल

 

नांदेडदि. 15 जुलै:-  रेशनकार्डवरील नावे कमी करणेनाव वाढविणे व नवीन शिधापत्रिका काढण्याची कार्यवाही पुरवठा विभाग व सेतु सुविधा केंद्रामार्फतच करावीत. याकामासाठी कुठल्याही मध्यस्थाच्याएजेंटच्या दलालाच्या भुलथापास बळी पडू नयेअसे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे. अशा प्रकारचे असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागू केलेल्या कागदपत्रामध्ये राशनकार्ड आवश्यक आहे. यामुळे राशनकार्डात नाव टाकणेवगळणे व नवीन राशनकार्ड काढणे याबाबत कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. त्याअनुषंगाने तहसिल कार्यालयाच्या आवारात काही दलाल कार्डधारकास भुलथापा देऊन व आर्थिक पिळवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

दिनांक 11 जुलै रोजी तहसिल कार्यालय नांदेड येथे शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी कार्डधारक आले असता तहसिलदार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक माधव विक्रम गोरे यांनी ही कागदपत्रे तपासली असता ऑनलाईन शिधापत्रिका बोगस असल्याचे आढळून आले आहे. सदर कार्डधारकास विचारणा केली असता त्यांनी एका व्यक्तीचे नाव मध्यस्य म्हणून सांगितले आहे. सदर व्यक्तीवर पो.स्टे वजीराबाद नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

राज्य शासनाकडून अत्यंत चांगली योजना आली आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये सर्व समाज घटकांना समाविष्ट करण्यात आलेले आहे. यासाठी कोणत्याही एजंट मध्यस्थ दलालाच्या मागे नागरिकांनी लागू नये. कोणालाही कुठेही पैसे देण्याची गरज नाही आहे. अर्ज भरणाऱ्यासाठी शासनाने प्रति अर्ज 50 रुपये भत्ता जाहिर केला आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणी पैसे मागत असल्यास तहसीलदारांच्या निर्देशास आणून द्यावेअसे आवाहन तहसीलदार नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 592

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लेखी अर्जाची छाननी करून ठेवा : जिल्हाधिकारी

 

छाननी समितीच्या पुढे जाताना पात्रअपात्र व त्रुटीचे अर्ज वर्गीकृत करण्याचे निर्देश

 

नांदेड दि. 15 जुलै : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात भरपूर प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन अर्ज ऐवजी ऑफलाइन अर्जाकडे नागरिकांचा कल असून आलेले सर्व अर्ज तालुकास्तरीय समिती पुढे छाननीला जाण्यापूर्वी वर्गीकृत करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संपूर्ण यंत्रणेला दिले आहे.

 

नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी आज घेतलेल्या संयुक्त बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेला या संदर्भात छाननी करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.

 

जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय छाननी समित्या गठीत होत आहेत. एकदा समित्यांची काम सुरू झाले की त्यांच्यापुढे जाताना आधीच अर्ज वर्गीकृत असले पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा हे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे आलेला प्रत्येक अर्ज परिपूर्ण असेल यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्याचे निर्देश आज त्यांनी दिले.

 

 ऑपरेटरकोतवाल सर्वांनी मदत करा

 

ऑफलाईन अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे ते ऑनलाईन करण्यासाठी मोठी मेहनत लागणार आहे.उपलब्ध मनुष्यबळामध्ये हे काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तथापिया कामासाठी तांत्रिक ज्ञान बाळगणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अन्य योजनांसाठी अनेक ठिकाणी ऑपरेटर घेण्यात आले आहेत. काही ठिकाणचे कोतवाल तंत्रस्नेही आहेत. त्या सर्वांना या कामाचे वाटप करण्यात यावे असेही त्यांनी सांगितले.

 

तहसीलदारांनी नियंत्रण ठेवावे

तालुकास्तरीय समितीमध्ये तहसीलदार हे सदस्य सचिव आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अंमलबजावणीची संपूर्ण अर्जाची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे अधिनस्त सर्व यंत्रणेवर तहसीलदाराने लक्ष ठेवावे. तसेच पात्र अपात्र व त्रुटीचे अर्जअशी विभागणी करावीतालुकास्तरीय समितीचे काम सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे,अशी जबाबदारी आज तहसीलदारांना सोपविण्यात आली आहे.

 

प्रोत्साहन भत्ता दिला जाणार

31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असली तरी पुढील काही दिवसातच सर्व पात्र उमेदवारांचे अर्ज भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने नव्या आदेशानुसार नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविकासमूह संघटक,मदत कक्ष प्रमुखआशा सेविकासेतू सुविधा केंद्र ,अंगणवाडी पर्यवेक्षिकाग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंद झाल्यावर पन्नास रुपये अर्ज प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहेयाचीही नोंद घेण्याचे स्पष्ट केले आहे.

 

फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करा

आपल्या परिवारातील भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळणारीत्यांना स्वावलंबन देणारी ही योजना आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र लाभार्थ्याचा अर्ज भरून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र तरीही काही असामाजिक प्रवृत्ती काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी किंवा पात्रता मिळून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करत असल्याचे लक्षात आले आहे. अशा व्यक्तींवर पोलिसांनी नजर ठेवावीअसे निर्देश दिले असून कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

0000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...