Monday, July 15, 2024

 वृत्त क्र. 594 

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना

 

नांदेड दि. 15 जुलै : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थीनिंनी सन 2024-25 या वर्षासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना चे परीपूर्ण प्रस्ताव संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नांदेड यांच्याकडे गुरूवार 25 जुलै 2024 रोजी पर्यंत विहित केलेल्या नमुन्यामध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

 

इतर मागास बहुजन कल्याण या विभागांतर्गत राज्यातील मान्यता प्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय/तंत्रनिकेतनामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी व शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या योजनेच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सदरील योजना ही व्यावसायिक/बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपाययोजनेबाबत जिल्ह्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांकडून सन 2024-25 या वर्षाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...