Monday, August 17, 2020

 वृत्त क्र. 770        

शनिवारी सकाळी 9 ते सायं 5 पर्यंत

अटी व शर्तींच्या अधिन राहून दुकाने चालू ठेवण्यास मुभा  

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात दर शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची होणारी गर्दी कमी रहावी यासाठी प्रत्येक शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील दुकाने, आस्थापने अटी व शर्तींच्या अधिन राहून चालू  ठेवण्याची मुभा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने शनिवार व रविवार वगळून सकाळी 9 ते सायं. 7 वाजेपर्यंत चालू ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. परंतू शनिवार व रविवारी दुकाने, आस्थापना बंद असल्यामुळे दर शुक्रवारी व सोमवारी बाजारात, दुकानात नागरिकांची गर्दी वाढत होती. उपाययोजनेचा एक भाग म्हणून सदर गर्दी कमी होण्यासाठी नांदेड जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे मुभा दिली आहे.    

 

तसेच कोव्हिड-19 च्या अनुषंगाने निर्गमीत केलेल्या सूचना व निर्देशाचे जो कोणी पालन करणार नाही अशा व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मान्यात येईल व कारवाई करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतूने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे. 

00000

63 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

 81 बाधितांची भर तर दोन महिलांचा मृत्यू   

नांदेड (जिमाका) दि. 17 :- सोमवार 17 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 63 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 81 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 43 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 38 बाधित आले.

आजच्या एकुण 436 अहवालापैकी  344 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 187 एवढी झाली असून यातील 2 हजार 477 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 534 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 184 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.    

रविवार 16 ऑगस्ट रोजी सरपंचनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात तर सोमवार 17 ऑगस्ट 2020 रोजी उमरी तालुक्यातील गोरठा येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 149 एवढी झाली आहे.    

आज बरे झालेल्या 63 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 3,  हदगाव कोविड केअर सेंटर 6, खाजगी रुग्णालय 1, किनवट कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, मुखेड कोविड केअर सेंटर 11, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 7, कंधार कोविड केअर सेंटर 4 असे एकूण 63 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 13, हदगाव तालुक्यात 6, किनवट तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, लोहा तालुक्यात 10, मुखेड तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 7, हिंगोली 1, यवतमाळ 1, लातूर 1 असे एकुण 43 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 12, नांदेड ग्रामीण 4, अर्धापूर तालुक्यात 1,  भोकर तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 5, कंधार तालुक्यात 2, मुदखेड तालुक्यात 7, नायगाव तालुक्यात 4, धर्माबाद तालुक्यात 2 असे एकुण 38 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 534 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 188, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 670, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 42, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 23, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 84,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 74, लोहा कोविड केअर सेंटर येथे 41, हदगाव कोविड केअर सेंटर 26, भोकर कोविड केअर सेंटर 25,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 7, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 75, किनवट कोविड केअर सेंटर येथे 18, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 8, मुदखेड कोविड केअर सेटर 30, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 7, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 17, खाजगी रुग्णालयात 137 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 516,

घेतलेले स्वॅब- 30 हजार 217,

निगेटिव्ह स्वॅब- 24 हजार 36,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 81,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 187,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 4,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 1,

एकूण मृत्यू संख्या- 149,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 477,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 534,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 443, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 184. 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...