Wednesday, December 6, 2017

10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा
                                                        --- जिल्हाधिकारी
नांदेड दि. 6 :- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. या कायद्यातंर्गत दिनाक 10 डिसेंबर हा दिवस समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी व्याख्यान / भाषणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
**** 
राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांचा
नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम  
नांदेड दि. 6 :- राज्याचे सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांचा शुक्रवार, दिनांक                       8 डिसेंबर, 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
शुक्रवार, दिनांक 8 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 2-15 वाजता अहमदपूर येथून शासकीय वाहनाने नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4-00 वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन . सांय 4-00 ते 5-00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे किमान आधारभुत किंमत खरेदी शेतमाल तारण योजनेचा आढावा (संदर्भ जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, नांदेड श्री. पी.आर. फडणीस मो.क्र. 8275055275). सांय. 5-00 ते 6-30 वाजेपर्यंत शंकरराव चव्हाण सभागृह, नांदेड येथे नंदिग्राम सहकारी रुग्णालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती . सांयकाळी 6-30 ते 7-00 वाजेपर्यंन्त भाग्यलक्ष्मी भवन, महावीर चौक , वजीराबाद , नांदेड येथील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी बँकेस भेट , रात्री 8-00 वाजता आनंद नगर,नांदेड येथे श्री. राम पाटील रातोळीकर , जिल्हा अध्यक्ष भाजपा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट (संदर्भ श्री. राम पाटील रातोळीकर मो.क्र. 9921902571). रात्री 10-00 वाजता शासकीय विश्रामगृह , नांदेड येथे आगमन राखीव .

***

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...